तानाजी चित्रपटात मला काही वेगळे सादर करायचे होते मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मला जोकर सारखे दाखवायचे होते.. सैफ अली खान !

4805

तानाजी चित्रपट साईन करण्याबाबत सैफ अली खान ने म्हटले होते की, या चित्रपटात त्याला काही वेगळा ड्रामा सादर करायचा होता. त्याला एकदम वेगळ्या प्रकारे काम करायची इच्छा होती. मात्र डायरेक्टरला माझ्या पात्राचा अभिनय हा कदाचित जोकर सारखा (कदाचित हॉलीवूड चित्रपट जोकर) हवा होता. सैफ अली खान म्हणतो की हे बोलणे सोपे आहे मात्र करणे मुश्किल. तुम्ही हळूहळू शिकत असता की लोक कसे बोलतात, त्यांचा बोलण्याचा लहेजा कसा असतो, प्रत्येकाची एक वेगळी विशिष्ट शैली असते. माझ्यासाठी सुद्धा हा एक वेगळा आणि शानदार अनुभव होता.
सैफ अली खानने त्याच्या दिग्दर्शकाचे कौतुक करताना सांगितले, मी ओम राऊत यांचे खूप आभार मानतो की त्यांनी माझा हात पकडून या रोल कडे मला घेऊन आले. त्याचबरोबर मी अजयला सुद्धा धन्यवाद म्हणतो कारण त्याने मला ही संधी दिली. हा चित्रपट देशभक्तीने परिपूर्ण होता. या चित्रपटात सारे काही होते. मात्र तरीही आम्हा कोणालाच वाटले नव्हते या चित्रपटाला एवढे यश मिळेल.
चित्रपट हिट झाल्यानंतर सैफ अली खानने म्हटले होते की, या चित्रपटात इतिहासाची छेडछाड करून एक काल्पनिक चित्रपट तयार केला आहे. सैफ अली खानच्या या वक्तव्यामुळे चर्चांना तुफान उठले होते. त्याचे हे विधान खूप व्हायरल झाले होते. सैफ अली खानने सांगितले की या चित्रपटात मुघलांना विदेशी दाखवले गेले आहे. मात्र खऱ्या इतिहासात मुघल पिढ्यानपिढ्या भारतात राहत होते. तानाजी या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान राठोड ची भूमिका साकारली होती.
सैफ अली खानच्या या मुलाखतीने खूप गोंधळ निर्माण झाला होता. असेही म्हटले जाते की सैफ अली खानच्या या वक्तव्यामुळे अजय देवगण सुद्धा खूप नाराज झाला होता.
त्यानंतर वक्तव्याचे सारवासारव करताना सैफ अली खानने सांगितले, त्याने केलेल्या वक्तव्याला मीठ-मसाला लावून लोकांसमोर पेश केले जात आहे. मी फक्त ऐतिहासिक तथ्यांवर टिप्पणी दिली होती.‌ सैफ अली खानच्या या विधानानंतर त्याला अनेक लोकांना सामोरे जावे लागले बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सैफ अली खान वर टीका करताना त्याला विचारले की जर पूर्वी भारत ही कन्सेप्टच नसती तर महाभारत कशावरून लिहिले गेले ? चित्रपटाच्या प्रमोशनावेळी अभिनेत्री काजोल ने सुद्धा सैफ अली खान ला टोमणा मारला होता की तो प्रमोशन सोडून सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यावेळी नवीन वर्षानिमित्त करीना आणि तैमूर सोबत सैफ सुट्टीवर गेला होता.
तानाजी या चित्रपटात सैफ अली खानने खलनायकी भूमिका साकारली होती. सैफ ने या भूमिकेला न्याय द्यायचा संपूर्ण प्रयत्न केला मात्र तरीही अजय देवगण आणि काजोल चे कौतुक मोठ्या प्रमाणावर झाले. सोबतच शरद केळकर ला सुद्धा त्याच्या कामाची पावती खूप चांगल्याप्रकारे मिळाली. मात्र सैफ अली खान च्या वाटेला जास्त टीका आल्या. चित्रपटातील सैफ अली खान च्या पात्राची तुलना ही रणवीर सिंह च्या अल्लाउद्दीन खिलजी सोबत केली जात होती. असेही म्हटले जाते की सैफ अली खान ने संपूर्ण चित्रपटात खिलजी ची कॉपी केली आहे.
सैफ अली खान आणि अजय देवगणने ओमकारा या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात सुद्धा सैफ ने निगेटिव्ह भूमिका केली होती आणि लंगडा त्यागी बनवून सर्व प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले होते. नुकतेच अजय देवगणने खुलासा केला की त्याच्यामध्ये आणि सैफ अली खान मध्ये कोणताच वाद नाही. आमच्यात वाद असल्याच्या केवळ अफवा होत्या.