मृणाल ठाकूरने एवढे बोल्ड फोटो शेअर केले कि लोक म्हणायला लागेल हिचे कपडे चोरीला गेले कि काय ?

235

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिचा बिकिनीमध्ये पोज देतानाचा एक फोटो इन्सटाग्रामवर शेअर केला होता. पण त्या फोटोमुळे मृणालला लोकांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मृणालने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. मृणालने 2018 मध्ये लव सोनिया या चित्रपटातून तिच्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली होती. ती सोशल मीडियावरपण खूप अॅक्टिव्ह असते.

मृणालला तिच्यात झालेला बदल दाखवायचा होता त्यासाठी तिने फोटोंची एक सिरीज शेअर केली. त्यातील एका फोटोत मृणालने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते.

तिच्या या फोटोवर निकम्मा फेम अभिनेता अभिमन्यु दसानी ने फायर इमोजीचे रिएक्शन दिले आहे तर श्वेता त्रिपाठी, अर्जुन बिजलानी यांसारख्या अनेक टीव्ही कलाकारांनी हार्ट इमोजी देत कमेंट केली आहे. पण सोशल मीडियावर काही यूजर्सना तिचा हा लूक आवडलेला नाही. पण मृणालने ट्रोलिंगकडे लक्ष दिलेले नाही.

तिच्या फोटोवर एका युजरने लिहिले, लाज नाही, शरम नाही तर दुसऱ्या एका युजरने कपडे चोरी झाले का असे कमेंटमध्ये विचारले. तर आणखी एका युजरने बॉलिवूडमधील एण्ट्रीचा परिणाम असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

“>
मृणालने एका मुलाखतीत सांगितले की तिच्या शरीराच्या आकारामुळे तिला खूप लाज वाटायची.तिला कमरेखालच्या भागाचे वजन कमी करण्यास सांगितले होते. पण एकदा अमेरिकेतल्या एका व्यक्तीने तिला इंडियन किम कार्दशियन सारखी दिसते

अशी कमेंट केली होती त्यामुळे लोक जेव्हा माझ्या फिगरकडे बघून मडके असे टिप्पणी देतात किंवा मला वाईट वाटेल असे काहीतरी बोलतात तेव्हा खरेतर मला काहीच फरक पडत नाही. मला त्याचा गर्व वाटतो. तिने पुढे सांगितले की आता माझ्यात फोटो पोस्ट करण्याची हिम्मत आली आहे.

ऋतिक रोशनसोबतच्या सुपर 30 चित्रपटात मृणालच्या कामाचे खूप कौतुक झाले. मृणालच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सीता रामम या चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !