सलमान खान यांच्या वडिलांवर लॉकडाऊन मोडल्याचा ठपका, पण मिळालं हे उत्तर !

363

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केला. या लॉक डाऊन च्या काळात सरकार लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे. परंतु या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेला अनेक संकटाना सामोरे जावे लागते आहे.
रोजंदारी वर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सतावत आहे. तर काही लोकांना वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यास अडचणी येत आहेत. परंतु अशा या लॉक डाऊन च्या परिस्थितीत सलमान खानचे वडील सलीम खान वॉक साठी बँडस्टँड येथे जातात अशी बातमी येत आहे.
यावर सलीम खान यांनी पिंकविला सोबत झालेल्या मुलाखतीत त्यांचे मत मांडले. त्यांनी सांगितले की त्यांना पाठीचा त्रास आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला रोज वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून रोज चालत फिरतो. डॉक्टरांनी सांगितले की मी जर अचानक चालणे बंद केले तर मला पुन्हा कंबरेला त्रास होऊ शकतो.

हे वाचा – चित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात !हे वाचा – या भारतीय क्रिकेटरचे करियर झाले फ्लॉप पण नशिबाने झाले राजकुमारी सोबत लग्न !

मी सरकार कडून यासाठी पास काढून घेतला आहे. शिवाय मी सरकार द्वारे घालण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन सुद्धा काटेकोर पणे करतो. सलीम खान यांनी पुढे सांगितले की ते केवळ मेडिकल इशू मुळे बाहेर फिरतात. आणि तिथे मी एकटाच नसतो जो वॉक साठी येतो.
तिथे मी माझ्या सारख्या अनेक लोकांना पाहतो. ते त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन फिरत असतात. पण त्यांची तक्रार मात्र कोणी करत नाही. मी एवढे खात्रीने सांगिन की सर्व सुरक्षा नियमांचे पालन करीन. आणि बाकी सर्व सुद्धा पालन करतच असतील अशी अशा व्यक्त करतो.

हे वाचा – बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !