Headlines

वाढदिवस स्पेशल : कधीकाळी कामासाठी वणवण भटकणारे ‘जेठालाल’ आता एका एपिसोडसाठी घेतात तब्बल एवढे रुपये, जाणून थक्क व्हाल !

जवळजवळ दहा वर्षांहुन अधिक काळ टिव्हीवर गाजत असलेला लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ घराघरात आवडीने पाहतात. हा शो गेली कित्येक वर्षे टिआरपीच्या स्पर्धेत टॉपला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या घरचेच वाटतात. त्यामुळेच त्यातील कलाकारांची फॅनफॉलोविंग खुप आहे. सुरुवातीपासुनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे जे आजतायागत कायम आहे. या मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल आणि दया यांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले. आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील जेठालाल बद्दल सांगणार आहोत.

दिलिप जोशी म्हणजे सगळ्यांचा लाडक्या जेठालालचा २६ मे ला वाढदिवस असतो. त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. जेठालाल म्हणजे दिलीप जोशी हे मुळचे गुजरातच्या पोरबंदर येथुन १० किमी पुढे असलेल्या गोसा गांवचा रहिवासी. एका इंटरव्ह्युमध्ये दिलिपने त्यांच्या स्ट्रगल बद्दल सांगितले होते. सुरुवातीला दिलीप या्ंनी एक बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणुन काम केले होते. तेथे त्यांना ५० रुपये प्रति भुमिकेचे मिळायचे. त्यावेळी त्यांना कोणी फारसे काम दिले नव्हते. तर आता अशी वेळ आली आहे कि कामासाठी वणवण भटकणारे दिलीप जोशी आता जेठालाल या पात्रासाठी प्रत्येक एपिसोडचे दिड लाख रुपये फि घेतात.

ते महिन्यातुन २५ दिवस शुटींग करतात. म्हणजेच ते दर महिना ३६ लाख रुपये कमवतात. ते त्यांच्या परिवारासोबत मुंबईत राहतात. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी थिएटर मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी सर्व प्रथम एका स्टॅच्युचा रोल साकारला होता. एका नाटकात सात ते आठ मिनिटे स्टॅच्यु बनुन उभे राहिले होते. दिलीप यांना दोनदा इंडियन नॅशनल थिएटर मध्ये बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.

मिडिया रिपोर्टर्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार दिलीप जोशीला लग्जरी कारस् चा खुप शौक आहे. त्यांच्याकडे ८० लाख किंमतीची ऑडी क्यु ७ कार आहे. याव्यतिरिक्त त्यांना टोयोटा इनोव्हा आणि एमपीवी गाड्या चालावलया सुद्धा आवडतात. तारक मेहता का उलटा का चष्मा हा शो मिळण्यापुर्वी दिलीप यांच्या कडे कोणतेच काम नव्हते. एका इंटरव्ह्युमध्ये दिलीप यांनी सांगितले कि फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये काहीच नक्की नसते. तुम्ही कितीही मोठे स्टार असलात तरी जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तोपर्यंतच तुमचा टिकाव लागु शकतो.

दिलीप जोशी यांनी ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हमराज’, ‘दिल है तुम्हारा’ यांसारख्या 15 सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला असे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !