मला तुझ्या तोंडावर पादावसं वाटतंय दिग्दर्शकाच्या अश्लील बोलण्यामुळे ह्या अभिनेत्रीने मोठ्या पडद्याला ठोकला रामराम

241

बॉलिवुडसृष्टी ही बाहेरुन दिसायला कितीही चकचकीत दिसत असली तरी इथे टिकणे किंवा काम मिळवणे प्रत्येकालाच जमते असे नाही. नशिब बलवत्तर असले तर किंवा पाठीशी एखादा गॉडफादर असेल तरच अथे टीकाव लागु शकतो. नाहीतर काही खरे नसते. अशातच जर एखादी स्त्री जर स्वताला बॉलिवुडमध्ये आजमवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग तिला तेथील चित्रविचित्र नजरा, टोमणे, अश्लिलता या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातुनच पुढे मी टु सारख्या चळवळींना तोंड फुटते.

आता असाच एक प्रकार बिग बॉस फेम रुबिना दिलैक सोबत घडली. तिला बॉलिवुड संबंधी आलेला एक वाईट अनुबव नुकताच शेअर केला. तिने सांगितलं की ती बॉलिवुडच्या एक दिग्दर्शकाला भेटायला गेली होती त्यावेळी त्या दिग्दर्शकाने तिला मला तुझ्या तोंडावर पादावेसे वाटते असे म्हटले. या घटनेनंतर रुबिनाने मोठ्या पडद्यावर कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी रुबिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तिने तिच्या सोबत घडलेला हा विचित्र प्रकार सांगितला. ती म्हणाली की रुबिनाला चित्रपटात काम करायचे होते त्यामुळे ती एका दिग्दर्शकाला भेटायला गेली होती. त्यावेळी त्या दिग्दर्शकाने मला तु माझा हा चित्रपट पाहिलास का अस विचारले..

यावर मी नाही असे उत्तर दिले आणि म्हटले कि मी त्यावेळी शाळेत होते व शिमला ला राहायचे. शाळेत असताना माझे पालक मला चित्रपट पाहण्यास परवानगी द्यायचे नाही त्यामुळे मला तेव्हा तुमचा तो चित्रपट पाहता आला नाही. माझे हे उत्तर ऐकल्यावर त्या दिग्दर्शकाने मला तुझ्या तोंडावर पादावसं वाटतयं असे म्हटले. आणि माझ्याकडे बघुन हसु लागले. त्यांची ही प्रतिक्रिया रुबिनासाठी अविश्वसनीय असल्यामुळे तिच्या पाया खालची जमीनच सकरली.

रुबिना दिलैकने छोटी बहु आणि शक्ती एक एहसास यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर ती लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणुन भाग घेतला होता. विशेष म्हणजे तिने या स्पर्धेच विजेतेपद सुद्धा मिळवलं.
रुबिनाबद्दल सांगायचे झाल्यास तिचा जन्म २६ ऑगस्ट १९८७ मध्ये झाला. २०१७ च्या इस्टर्न आय टॉर ५० सेक्सीएस्ट एशियन वुमनच्या यादीत रुबिनाला १० वे स्थान मिळाले होते. २००६ मध्ये ती मिस इंडीया ठरली होती. रुबिनाने २०१८ मध्ये अभिनव शुक्ला सोबत लग्न केले. विशेष बीग बॉस मध्ये तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा स्पर्धक म्हणुन सहभागी झाला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !