आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलीवूड विश्वाची क्वीन ठरलेली तसेच बॉलीवुड मधील अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारी कंगना हिला आपण सर्वजण जाणतोच. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर कंगनाने अनेक विषयावर भाष्य केले आणि बॉलिवूडमध्ये जी काही घराणेशाही आहे त्यावर कडाडून विरोध केला. तिच्या स्पष्टवक्ते पणामुळे आता स्वतःला विचार करण्याची वेळ तिच्यावर आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया तिच्याबद्दल काही न जाणलेल्या सुद्धा गोष्टी.
गेल्या काही दिवसांत कंगना रनौतने मुंबई ला पीओके बोलून शिवसेनाच्या निशाण्यावर आली आहे आणि या नंतर सर्व प्रकरणाचा परिणाम मुंबई येथे असलेल्या कार्यालयावर झाला, ज्याला अतिक्रमण म्हणून बीएमसी ने तोडले. कंगनाच्या या कार्यालयाची किमंत ४८ कोटी रुपये सांगितली जात आहे. कंगना चित्रपट इंडस्ट्री मधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी ११कोटी रुपये घेते, याशिवाय ती अनेक जाहिरातीमध्ये सुद्धा काम करते त्या कामाचे ती १ते २ कोटी रुपये मानधन आकारते.
कंगनाच्या संपत्ती बद्दल एका ‘सीए नॉलेज’ नामक वेबसाइट वर प्रकाशित अहवालानुसार, कंगनाची एकंदरीत संपत्ती १३ मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ९६ कोटी रुपये एवढी आहे. चित्रपट आणि जाहिराती करण्यासोबतच कंगनाने प्रोडक्शन क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण केले आहे.
रियल इस्टेट मध्ये कंगना बॉलीवुड मधील ज्या लोकांपैकी एक आहे जी सर्वात जास्त आयकर भरते. कंगनाच्या संपत्ती मध्ये रियल इस्टेट सुद्धा समाविष्ट आहे. कंगनाने येथे सुद्धा खूप मोठी गुंतवणूक केली आहे. हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे राहणारी कंगना राणावत आपल्यासाठी एक आलिशान बंगला खरेदी केला होता, ज्याची किंमत २० कोटी रुपये एवढी आहे. एवढेच नाही तर कंगना जवळ ऑर्गेनिक फॉर्म सुद्धा आहे आणि ती सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेत असते.
शौकीन कंगनाजवळ मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँड असणाऱ्यांच्या गाड्यांचा सुंदर असा संग्रह आहे. सीए नॉलेज वेबसाइटच्या अहवालानुसार असे सांगितले जात आहे की कंगनाजवळ एक बीएमडब्ल्यू ७ सिरीज आणि एक मर्सिडीज बेंज GLE SUVआहे. बीएमडब्ल्यू ७ सीरीज ची किंमत १.३५ कोटी रुपये आणि मर्सिडीज बेंज GLE SUV ची किंमत ७३ लाख रुपये पासून भारतात सुरुवात होत असते. कंगना जवळ याशिवाय सुद्धा अनेक गाडी आहेत.
क्वीन कंगना आपल्या चित्रपटातून कंगनाने वेगवेगळ्या भूमिका साकारून आपले वेगळेपण नेहमी जपले आहे. कांगनाने आतापर्यंत खूप भूमिका साकारल्या. त्या सर्वच गाजल्या. फॅशन, पंगा, मनिकर्णिका, क्वीन, इत्यादी चित्रपटात कंगनाने अभिनय केला आहे.
वरील लेख आपल्याला आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.