एवढ्या करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे संजय दत्त, जाणून घ्या त्याच्या कार पासून ते घरापर्यंत च्या गोष्टी !

5768

भारतीय सिनेमासृष्टीत रागीट स्वभाव, डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमेडी सोबत अभिनयाची एक वेगळीच परिभाषा निर्माण करणाऱा अभिनेता कोण हे वेगळे जाणून घेण्याची गरज नाही. कारण अशा व्यक्तिमत्वासाठी त्याचे नावच खुप आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर तो आहे संजय दत्त. संजय दत्तचे चाहाते त्याला बाबा या नावाने ओळखतात. संपूर्ण जगभरात त्याच्या कार्याच्या चर्चा होत असतात.
संजय दत्तने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९७२ मध्ये एक बालकलाकार म्हणून केली होती. त्याचा पहिलाच चित्रपट रॉकी हा त्या वेळचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अभिनयाव्यतिरिक्त संजय दत्तने प्लेबॅक सिंगर, वॉईस नरेटर आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता म्हणून देखील काम केले. १९९६ मध्ये संजय दत्तने निर्माता बनवण्याचा विचार केला आणि स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन प्रा. लिमिटेड या प्रोडक्शन हाऊस ची स्थापना केली. संजय दत्तने लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस मध्ये टीव्ही होस्ट म्हणून सुद्धा काम केले होते. हिंदी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये संजय दत्तचे नाव सहभागी आहे. या यादीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी त्यास एक मानले जाते.
संजय दत्तकडे अमेरिकन डॉलर नुसार एकूण २१.२ मिलियन डॉलर संपत्ती आहे.‌ म्हणजेच भारतीय चलाना नुसार १३७ करोड रुपये इतकी संपत्ती संजय दत्त कडे सध्या आहे. चित्रपटांत सोबतच तो काही कंपन्यांचा ब्रँड अँबेसिडर सुद्धा आहे याद्वारे देखील संजय दत्त खूप पैसे कमावत असतो. पोलिओ उपचारासाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करतो. सामाजिकीकरण आणि दान धर्मात संजय दत्त सढळ हस्ते मदत करीत असतो. याव्यतिरिक्त सर्वाधिक आयकर रुपी पैसे भरणाऱ्या अभिनेत्यांनी पैकी संजय दत्त एक आहे.
मुंबईसारख्या मायानगरीत संजय दत्तची अनेक घरे आहेत. मात्र सध्या तो ५८ smt नर्गिस दत्त रोड, पाली हिल, बांद्रा येथे राहतो. तो राहत असलेल्या घराजवळील रस्त्याचे नाव हे त्याच्या आईच्या नावावरूनच ठेवले गेले आहे. २००९ साली संजय दत्तने हे घर खरेदी केले होते.
संजय दत्त कडे असलेल्या कारस् बद्दल बोलायचे झाल्यास त्याच्याकडे रेड फेरारी ५९९ जीटीबी गाडी आहे. याव्यतिरिक्त रोल्स-रॉयस घोस्ट, ऑडी ए ८ एल १२, ऑडी आर ८, ऑडी क्यू ७, बेंटले कॉन्टिनेन्टल जीटी, टोयोटा लँड क्रूझर, एक मर्सिडीज एम क्लास, लेक्सस एल एक्स ४७०, पोर्श एस यू वी, हार्ले डेव्हिडसन आणि एक्सोटिक्स यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !