Headlines

पुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा वाटा, जाणून घ्या !

साऊथकडील सुपरस्टार अल्लु अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदनाने पुष्पा द राइज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आपला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने डब केले आहे.
पुष्पा द राइज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असुन या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहयला मिळत आहे.

प्रेक्षकांना सुद्धा ट्रेलर पसंतीस पडला आहे. ट्रेलरमध्ये अल्लु अर्जुनची जबरदस्त ट्रेनिंग पाहयला मिळत आहे. पुष्पा द राइज’ हा पॅन इंडियाचा पहिला प्रोजेक्ट आहे जो दक्षिणात्य भाषांव्यतिरिक्त हिंदी भाषेत सुद्धा प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर लॉन्च झाला आहे.

या हिंदी ट्रेलरमध्ये अल्लु अर्जुनचा व्हॉइस ओव्हर मराठमोळा बॉलिवुड अभिनेता श्रेयस तळपदेने दिला आहे. श्रेयसने यासंदर्भातील माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहे. भारताचा सर्वात स्टाइलिश आणि महान अभिनेत्याला आवाज देणे खुप अभिमानास्पद असल्याचे श्रेयसने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)


रश्मिका आणि अल्लु अर्जुनची जोडी पहिल्यांदाच येणार एकत्र – या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसोबत रोमान्ससुद्धा पहायला मिळणार आहे. यात रश्मिका आणि अल्लु अर्जुनची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स देखील दोघांना एकत्र पाहण्यासाठी खुप उत्सुक आहे. या चित्रपटात चंदनाच्या लाकडांची तस्करी दाखवण्यात आली आहे. त्याविरुद्ध अल्लु अर्जुन लढताना दिसेल. चित्रपटात अल्लु अर्जुन पुष्पा राजची भुमिका साकारत आहे.

अभिनेता अजय देवगणने सुद्धा त्याच्या सोशल मिडीया अकाउंट वरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर आहे तसेच चित्रपटासाठी अल्लु अर्जुनला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुकुमार यांनी यापुर्वी अल्लु अर्जुन सोबत आर्या, आर्या 2 सारख्या चित्रपटात काम केले आहे. तर या चित्रपटाची गाणी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केली आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !