ऑस्कर्स अवार्ड शोमध्ये राम चरणच्या पत्नीने भारतीय साडीत वेशभूषेत केली एन्ट्री, गरोदर असून देखील जपली भारतीय संस्कृती!

928

नुकताच ऑस्कर शो पार पडला. या ऑस्कर अवॉर्ड मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. भारतीय चित्रपट मध्ये आर आर आर या चित्रपटाने ऑस्कर्स 2023 मध्ये अनेक दिग्गज यांना मागे टाकून यासाठी बेस्ट ओरिजनल सॉंग चा किताब आपल्याला नावावर केलेला आहे. या किताबामुळे फक्त भारतालाच नाही तर जगभरामध्ये या गाण्याचे कौतुक होत आहे, तसेच या चित्रपटाची टीम देखील आपल्याला दिसली. यांची कामगिरी कौतुकास्पद दिसू लागली आहे.

या आनंदाच्या सोहळ्यामध्ये रामचरण ची पत्नी उपासनाने देखील हजेरी लावली होती. या ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये रामचरण च्या पत्नीने भारतीय वेशभूषा परिधान केली होती. ती साडी नेसून या कार्यक्रमाला आली होती, त्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या. अनेकांनी तिच्या या साडीतल्या लूक चे कौतुक देखील केले आणि म्हणूनच सात समुद्र पार देखील तिने भारतीय संस्कृती मोठ्या आनंदामध्ये दाखवून दिली. अनेकांना तिने नेसलेली साडी देखील आवडली म्हणूनच भारतीय संस्कृतीला अभिमानाने आपल्या सोबत तिने ऑस्कर शोमध्ये नेली असे अनेकांचे म्हणणे देखील आहे, म्हणून अनेक जण सोशल मीडियावर तिचे अभिनंदन व कौतुक देखील करत आहे.

रामचरण च्या पत्नीबद्दल सांगायचे झाल्यास काही महिन्यापूर्वी तिने आपल्या प्रेग्नेंसी बद्दल लोकांना सांगितले होते परंतु यावर फंक्शनला ती गरोदर असून देखील आली होती. तिला आपल्या नवऱ्याच्या या आनंदामध्ये सहभागी व्हायचे होते,हा क्षण तिच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. या कार्यक्रमाला जेव्हा ती साडी नेसून आली तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हता, नाईट फंक्शन साठी अनेक लोक सिलेब्स डार्क किंवा ब्राइट टोन्स असलेले कपडे निवडतात परंतु उपासनाने या अवॉर्ड फंक्शन साठी आयवरी शेडचे कपडे निवडले होते, तिचे चमकणारे कपडे लाईटच्या बदलते शेडमध्ये कधी ग्रे तर कधी क्रीम टोन मध्ये रिफ्लेक्ट करत होते.

उपासनाने हा लूक अगदी स्टायलिश पद्धतीने कॅरी केला होता. या साडी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. साडी परिधान केल्यानंतर उपासनाने हातामध्ये भरलेल्या मोतीच्या बांगड्या देखील घातल्या होत्या, ज्या तिच्या साडीच्या लेसला अगदी मॅचिंग होत होत्या. उपासनाने गळ्यामध्ये नेकलेस आणि कानामध्ये फ्लावर शेपच्या घातल्या होत्या ज्यामुळे डार्क पिंक आणि रेड टोन तिच्या सौंदर्यामध्ये भर पाडत होत्या. एकंदरीत सगळ्या लूक मध्ये ती खूप सोज्वळ आणि सुंदर दिसत होती. अभिनेता रामचरण पेक्षा त्याच्या पत्नीची चर्चा या अवॉर्ड फंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसली.

उपासनाच्या लेस व नटलेल्या साडी बद्दल जर बोलायचं झाल्यास या साडीला डिझायनर जयंती रेडी ने तयार केले होते. या साडी बद्दल अजून तरी किमती बद्दल काही कळाले नाही परंतु ही साडी डिझायनरच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील अजून उपलब्ध नाही. याचा अर्थ सरळ होतो की, या अवॉर्ड फंक्शन साठी उपासनाने ही साडी स्पेशल डिझाईन करून घेतली आहे. या साडीचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर उपासनाच्या सौंदर्याबद्दल सगळीकडे चर्चा देखील केली जात आहे. अनेक महिलांना उपासनाने घातलेली साडी आवडलेली आहे.

आर आर मधील प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता रामचरण बद्दल बोलायचं झाल्यास,त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रामचरण हा एक हँडसम अभिनेता आहे, त्याचबरोबर त्याच्या हँडसम शैलीची चर्चा देखील चित्रपट सृष्टी मध्ये केली जाते. या ऑस्कर फंक्शनला हे दोघे पती-पत्नी एकत्र आपल्याला दिसले होते, त्याचबरोबर रामचरण ने देखील काळा पायजमा तयार केलेला होता, ज्यामुळे तो अतिशय सुंदर दिसत होता.

या कार्यक्रमासाठी रामचरण ने काळ्या रंगाचा पजामा तयार केला होता, ज्याच्या पॅन्टवर वेगवेगळ्या स्टाईल मध्ये स्टीच केले होते, त्याचबरोबर या पजामा वरती काळा रंगाचा कुर्ता घातला होता तसेच मखमली ब्लॅक जॅकेट देखील या कुर्तावर रामचरणने घातला होता. या सूटवर काळ्या रंगाचे चमकणारे शूज आणि ट्रिम हेअर अँड दाढीमुळे त्याचा लुक अगदी परफेक्ट वाटत होता..