Headlines

धनुष सोबत घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर रजनीकांतच्या मुलगीला किती पैसे मिळू शकतात, जाणून घ्या धनुष किती संपत्तीचा मालक आहे !

साऊथ फिल्म इंडस्ट्री म्हटली की सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येते ते म्हणजे द सुपरस्टार रजनिकांत. सध्या रजनिकांतच्या घरात एक वादळ आलेले आहे ते म्हणजे त्यांचा जावई धनुषने लग्नाच्या १८ वर्षानंतर पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी ऐश्वर्या आणि धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. धनुषने लिहिले की, त्याने आणि ऐश्वर्याने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

घ’ट’स्फो’टा’च्या बातमीने केवळ साऊथ इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडलाकरांना देखील धक्का बसला होता, नुकताच अक्षय कुमार आणि सारा अली खानसोबत धनुषचा ‘अतरंगी रे’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा हे धनुषचे खरे नाव असल्याचे फारच कमी जणांना माहित असेल. आपल्या अभिनयकौशल्याने धनुषने केवळ दक्षिणेतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही नाव कमावले. मात्र, तरीही त्यांची सर्वाधिक ओळख ही सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा जावई म्हणुनच होती. पण तसे पहायला गेल्यास धनुषचे स्टारडमही सासरच्यांपेक्षा कमी नाही. ‘रांझना’ या बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.

धनुषच्या लाईफस्टाइलबद्दल सांगायचे झाल्यास अब्जाधीश असूनही तो साधे जीवन जगतो. २०१३ मध्ये जगभरात सोशल मीडियावर व्हायरल झालेले धनुषचे ‘कोलावेरीडी’ हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले होते. या गाण्यानंतरच इतर लोकांना धनुषबद्दल ओळख झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष एका चित्रपटासाठी भरघोस फी घेतो, मिळालेल्या माहितीनुसार तो एका चित्रपटासाठी ८ ते १० कोटी रुपये घेतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांतची मुलगी आणि धनुषची पुर्व पत्नी ऐश्वर्या ही देखील एक गायिका आहे ती एका वर्षात ७ ते ३५ कोटी रुपये कमावते. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांची संपत्ती एकत्र केली तर ती रक्कम फार मोठी होते. पण लग्नाच्या १८ वर्षांनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धनुषची स्वताची एकट्याची संपत्ती सुद्धा कमी नाही. एका अहवालानुसार, अभिनेता धनुषने २०२० मध्ये सुमारे १४५ कोटी रुपये कमावले होते.

एवढेच नव्हे तर कोरोना संकटातही धनुषच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नव्हता. रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये त्याने १४२ कोटी रुपये कमावले. त्याच वेळी, इतर अहवालांनुसार, धनुषची २०२१ मध्ये एकूण संपत्ती २२ मिलीयन डॉलर म्हणजेच 160 कोटी होती. धनुषच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत सातत्याने रु. 7 ते 8 कोटी रुपयांची वाढ होत आहे. धनुषची सर्वाधिक कमाई जाहिरातींमधून होते.

रिपोस्टनुसार, धनुषचे सध्याचे राहते घर हे २० ते २५ कोटी रुपयांचे आहे. धनुष चेन्नईच्या सर्वात पॉश भागात राहतो. याशिवाय धनुषने इतर अनेक मालमत्तांमध्ये त्याचा बराचसा पैसा गुंतवला आहे. अभिनयासोबतच धनुष दिग्दर्शक, पार्श्वगायक आणि निर्माता म्हणून देखील काम करतो व त्यात त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. खरे तर धनुषला अभिनेता बनायचे नव्हते तर मरीन इंजिनियर बनायचे होते, पण नशिबाने त्याला चित्रपटांकडे नेले.

28 जुलै 1983 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेला धनुष आज चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे, तो त्याच्या वडिलांमुळे चित्रपटात हे फार कमी लोकांना माहित आहे. धनुषचे वडील कस्तुरी राजा आणि त्याचा भाऊ देखील चित्रपट निर्माता आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते की , धनुषचे केवळ १० वी पर्यंतचेच शिक्षण झाले आहे, तो १२ वी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला होता. पण काही लोक असेही म्हणतात की त्याने आपला अभ्यास चालू ठेवला आणि नंतर बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (बीसीए) मध्ये पदवी घेतली. मदुराई कामराज विद्यापीठात शिकून त्यांनी ही पदवी मिळवली असल्याचे म्हटले जाते.

धनुष आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी २००४ साली एकमेकांसोबत विवाहगाठ बांधली. या दोघांना यात्रा आणि लिं’गा ही दोन मुले देखील आहेत. घ’ट’स्फो’टा’ची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच धनुष आणि ऐश्वर्याचे विभक्त झाल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या मात्र, त्यावेळी दोघांनी हे बातमी फेटाळून लावली होती. धनुषने आतापर्यंत सुमारे ४६ चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याला फेअर अवॉर्ड, ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अन्य 13 पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्य़ात आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !