‘बाहुबली’ फेम ‘देवसेना’ ‘अनुष्का शेट्टी’ मध्ये झालाय खूपच बदल आत्ताचे फोटो पाहून ओळखू शकणार नाही तिला !

220

आपल्यापैकी अनेकांनी बाहुबली हा चित्रपट पाहिला असेल. बाहुबली हा चित्रपट आला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची रेलच लागली होती. क्वचितच आता देखील एखादा व्यक्ती असेल की ज्याने हा चित्रपट पाहिला नसेल, परंतु बाहुबलीने चित्रपट क्षेत्रातील सर्व रेकॉर्ड तोडले आणि सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविले. या चित्रपटांमध्ये तगडी कास्ट होती. प्रत्येकाने आपल्या भूमिकेसाठी महत्त्वाचे मेहनत देखील घेतली. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला बाहुबली चित्रपटातील सर्वात प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी बद्दल माहिती सांगणार आहोत.

अनुष्का शेट्टी एक रूपवती तसेच एक उत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. अनुष्काने आतापर्यंत वेगवेगळे चित्रपट केले आहे. बाहुबली या चित्रपटांमध्ये देवसेना ही भूमिका करताना तिला खूप सारी तयारी देखील करावी लागली. चित्रपट यशस्वी होण्यासाठी प्रत्येक अभिनेता व अभिनेत्री आपल्या लुकवर देखील विशेष लक्ष देत असतात.

अनुष्का शेट्टीच्या बाहुबली चित्रपटातील भूमिकेला लोकांनी खूपच पसंती दिली होती. नुकतेच अनुष्का शेट्टीचा एक नवीन लुक व्हायरल झालेला आहे. हा लूक पाहून तिचे चाहते या लेटेस्ट लूक मध्ये तिला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे म्हणूनच तिच्या चाहत्यांची कसरत झालेली आपल्याला पाहायला मिळाली.

बाहुबलीच्या देवसेनेने पोस्ट केला स्वतःचा लेटेस्ट लूक – आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, देवसेनाची भूमिका अनुष्का शेट्टीने साकारली होती. ही भूमिका करत असताना अनुष्का खूपच बारीक आणि दिसायला सुंदर होती. ती अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या कामांमध्ये सक्रिय देखील दिसायची कारण की तिची भूमिका एका योद्धाची होती म्हणूनच तिला एका प्रकारची काळजी देखील घेणे गरजेचे होते परंतु आता ही अभिनेत्री अशी सडपातळ अजिबात दिसत नाही. तिचे वजन वाढलेले आहे. वाढलेल्या वजनामुळे तिला पुन्हा ओळखणे कठीण होऊन बसले आहे म्हणूनच तिच्या चाहत्या वर्गांनी देखील तिला ओळखले नाही.

काही दिवसापूर्वी अनुष्का शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिचे वाढलेले वजन प्रामुख्याने दिसून येत होते. ती पूर्वीपेक्षा सुदृढ झालेली पाहायला मिळाली आणि चहात्या वर्गांना प्रश्न निर्माण झाला आहे की हीच अनुष्का शेट्टी आहे?, का जिने देवसेनाची भूमिका साकारली होती!

अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ ती आपल्या चहात्या वर्गांसाठी पोस्ट करत असते, असेच काही दिवसापूर्वी अनुष्काने पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये काही फोटो अपलोड केले. हे फोटो अपलोड करताच सेकंदामध्ये प्रचंड प्रमाणात वायरल झाले. काहींना फोटो आवडले तर काही फोटोंना लोकांनी कमेंट देखील केल्या, त्याचबरोबर फोटोमध्ये असलेल्या अनुष्का शेट्टी ला अनेकांनी ओळखले देखील नाही.

या फोटोमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाची सलवार सूट परिधान केलेले आहे त्याचबरोबर केस मोकळे ठेवले आहे. या सिंपल लूक मध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे परंतु फक्त वजन वाढल्या कारणाने तिला ओळखणे कठीण झालेले आहे. ती लवकरच वजन कमी करेल आणि पुन्हा आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या भूमिका दिसेल, अशी आशा देखील अनेक चाहत्यांनी व्यक्त केलेली आहे.