सलमान खानला किस करू इच्छिते ही अभिनेत्री, तसेच बोलून दाखवल्या मनातल्या इच्छा !

3881

बॉलीवूड मधील सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. चित्रपटांपेक्षा सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी च जास्त चर्चेत असतो. सलमान खानचे अजुन ही लग्न झालेले नाही तरी सुद्धा त्याचे नाव बॉलिवुड मधील अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिने ती सलमान खान ला किस करू इच्छिते असे वक्तव्य केले. चला तर मग जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री.
आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नावं आहे डेजी शाह. डेजी शाह ही बॉलिवुड मधील एक सुंदर अभिनेत्री आहे. तिने सलमान खानच्या जय हो या चित्रपटातून बॉलिवुड मध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी एका मॅगझिन ला मुलाखत देताना डेजी ने सांगितले की तिला लग्न करायला आवडत नाही आणि ती तिच्या मित्र परिवाराला सुद्धा लग्न न करण्याचे सल्ले देते.
डेजी म्हणते की सलमान खान हा बॉलिवुड मधील सर्वात चांगला माणूस आहे. मला त्यांच्यावर प्रेम करायला खूप आवडेल. एवढेच नाही तर त्याला मिठी मारून त्यांना किस करण्याची माझी इच्छा आहे. आता यावर सलमान खान काय म्हणतो हे जाणणे उत्सुकतेचे ठरेल. डेजी शाह सलमान खान सोबत रेस ३ या चित्रपटात सुद्धा दिसली होती. या चित्रपटात तिने सलमानच्या बहिणीची भूमिका केली होती.
डेजीने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या असिस्टंट कोरियोग्राफर चे काम सुद्धा केले होते. तिने गणेश आचार्य यांच्यासोबत जमीन आणि खाकी या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली होती. डेजी गुजराती असून तिचा जन्म मुंबईत झाला. तिने तिचे शिक्षण खालसा कॉलेजमधून पूर्ण करून मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.

लाल ड्रेस मधील सलमान सोबत असलेली अभिनेत्री डेसी शाह असून ती जय होच्या प्रोमोशन साठी कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती. त्यानंतर सर्वप्रथम तिने बॉडीगार्ड या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डेजीने आतापर्यंत रहना है तेरे दिल में, जय हो, रेस ३, तेरे नाम, मस्ती, हमको दीवाना कर गई, खुदा कसम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !