आता ‘इम्रान हाश्मी’ रोमॅन्स करताना दिसणार टॉलीवूडमधील या अभिनेत्रीसोबत, जाणून घ्या कोण आहे ती !

743

हिंदी चित्रपटातील सृष्टीत अनेक रोमांटिक अभिनेते आहेत. अनेक प्रेम कथा, ॲक्शन चित्रपट यांममधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर आज अशाच एक अभिनेत्याबद्दल आणि त्याचा आगामी चित्रपटाबद्दल जाणून
घेणार आहोत. तो अभिनेता आहे इम्रान हाश्मी.
अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये इम्रान हाश्मीने काम केले आहे. मर्डर, जहर, आशिक बनाया आपने, कलयुग, जन्नत, राज इत्यादी चित्रपटात काम करून इम्रानने सगळ्यांना त्याचा अभिनय कौशल्याची भुरळ पाडली.
येत्या वर्षात इम्रान हाश्मीचा एक नवा चित्रपट येणार आहे. त्याचं नाव आहे “इज्रा”.
या आगामी चित्रपटाच्या अनेक चर्चा होतं आहेत. जय कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित व भूषण कुमार निर्मित इज्रा हा एक भयपट आहे. या चित्रपटामध्ये इम्रान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इम्रान हाश्मी सोबत या चित्रपटामध्ये प्रसिद्ध टॉलीवूडमधील अभिनेत्री दर्शना बनिक इम्रान हाश्मीसोबत या चित्रपटांत स्त्री मुख्य भूमिकेत दिसेल.
दर्शना बनिक ही बंगाली व तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने मॉडेल म्हणून तिचा करियरला सुरुवात केली. तिने सुरुवातीला काही उत्पादनांचे ब्रँड अँबेसिडर म्हणून काम केले. कलर्स, वोडाफोन, बोरोलीन या उत्पादनांची ती ब्रँड अँबेसिडर राहिली आहे.

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !या नव्या जोडीला एका नव्या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नवीन कथा आणि दमदार अभिनयाने परिपूर्ण असा हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यात सिनेमागृहात दाखल होईल. प्रेक्षक या चित्रपटाला किती पसंती देतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

हे वाचा – एका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की किस्सा काय आहे !

हे वाचा – कलाकारांनी चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते, जाणून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !