करोडो रुपयांची ऑफर येऊन सुद्धा ही अभिनेत्री देत नाही किसिंग सीन !

787

आज-काल चित्रपटात अभिनेत्रींसाठी किसिंग सीन देणे ही कोणती मोठी गोष्ट राहिलेली नाही. आज-काल अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये सर्रास किसिंग सीन देताना दिसतात. परंतु या सगळ्यांना अपवाद म्हणून अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यापूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना त्यांचे नियम सांगतात आणि चित्रपटात अजिबात किसिंग सीन देत नाहीत. या अभिनेत्रींनी पैकी एक आहे कीर्ती सुरेश. कीर्ती सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी खूप चर्चेत आहे.
तानाजी चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर अजय देवगन चा मैदान हा चित्रपट येऊ घातला आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात अजय देवगन सोबत लीड रोलमध्ये कीर्ती सुरेश देखील दिसेल.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे शूटिंग करतेवेळी स्वतःने स्वतःला घातलेले नियम काटेकोरपणे पाळतात. जसे की सलमान खान कोणत्याही चित्रपटात अभिनेत्रीला किस करत नाही, तसेच अक्षय कुमारचा नियम आहे की तो रविवारी शूटिंग करत नाही. या सर्वांप्रमाणेच कीर्ती सुरेशचा देखील कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन न देण्याचा नियम आहे. कीर्तीला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शकांची रांग लागलेली असतेच‌. परंतु तो चित्रपट अधिक मसालेदार बनवण्यासाठी अनेकदा दिग्दर्शक निर्माते तिच्याकडे किसिंग सीन देण्याची मागणी करतात व हे किसिंग सीन देण्यासाठी तिला करोडो रुपयांची ऑफर सुद्धा देतात. समोरून करोडा रुपयांची ऑफर येऊन देखील कीर्ती पैशांसाठी कधीही किसिंग सीन करण्यासाठी मान्य होत नाही. कीर्तीने आज पर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे परंतु तरीही ती संस्कारी आहे आणि सर्वसामान्य जीवन जगणे पसंत करते.

कीर्तीने साउथ कडील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे व आता ती अजय देवगन च्या मैदान या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेली आहे. हा चित्रपट 27 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाचे काही पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्याला लोकांनीसुद्धा पसंती दर्शविली आहे. हा चित्रपट दिग्गज फुटबॉल पटू कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत स्वतः अजय देवगन दिसणार आहे.