पहिल्याच चित्रपटात केला स्वतःपेक्षा २४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमॅन्स, आता झालेय खूपच बोल्ड !

6516

बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या सौंदर्यामुळे आणि हॉटनेस मुळे मीडियामध्ये चर्चेत असतात. पण साऊथ कडील अभिनेत्री सुद्धा बॉलिवूड अभिनेत्रींच्यापेक्षा कमी नाही. सध्या साऊथ कडील अभिनेत्री सुद्धा त्यांच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात.

आज आम्ही तुम्हाला साउथ कडील अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत तिच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहित नसेल. साला खडूस या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रितिका सिंह दिसायला खूप सुंदर आणि बोल्ड आहे. रितिका चा पहिलाच चित्रपट साला खडूस हा हिंदी सोबत तमीळ भाषेत सुद्धा प्रदर्शित झाला होता.
रितीकाने तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्याहून २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता आर. माधवन सोबत रोमान्स केला होता. रितिकाला तिच्या फिल्मी करियरमध्ये हवे तसे यश संपादन करता आले नाही. पण तिच्या सौंदर्यामुळे आणि बोल्डनेस मुळे सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल होत असतात.

याच कारणाने तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तिच्या सौंदर्या मुळे आणि हॉटनेस मुळे इंस्टाग्राम अकाऊंट वर तिचे १.३ मिलियन हून अधिक फॉलोवर आहेत. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट नवनवीन फोटो शेअर करत असते. सध्या तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

रितिका अभिनेत्री सोबतच एक मार्शल आर्टिस्ट सुद्धा आहे. रितिकाने लहानपणासूनच तिच्या वडिलांकडून किक बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेतले. साला खडूस या चित्रपटासाठी तिला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणून पुरस्कार दिला होता.

तसेच याचं चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट महिला पदार्पण म्हणून फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !