पतीपेक्षा जास्त आहे कमाई, तरीही नाही कुठला अहंकार, पतीला देते परमेश्वराचा दर्जा !

13660

चित्रपट क्षेत्रात अनेक असे अभिनेता अभिनेत्री आहेत की ते आज यशाच्या सर्वोत्तम शिखरावर वास्तव्य करत आहेत. काहींना आपल्या यशाचा सार्थ अभिमान आहे तर काहींना मिळालेल्या यशाचे काहीच कौतुक वाटत नाही. ही मंडळी अगदी सर्वसामान्य माणसांप्रमाणे वागत असतात. भारतात अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने करोडो लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

लोकांना आपल्या अभिनयाने दिवाने केले आहेत आणि त्या करोडो रुपाये कमवत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत .जी आपल्या पतीपेक्षा जास्त कमावत आहे परंतु तिला आपल्या कमाई वर थोडासा सुद्धा अहंकार नाही.

मित्रांनो , आपण ज्या अभिनेत्रींबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नाही तर भोजपुरी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालीसा आहे. जिने बिग बॉस या रियालिटी शो द्वारे प्रचंड प्रमाणात लोकप्रियता प्राप्त केली होती. भोजपुरी चित्रपट शिवाय अनेक टीव्ही मालिका यामध्ये अभिनय करताना ती दिसली आहे. तिने आतापर्यंत १२५पेक्षा जास्त भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मोनालिसाचे स्टारडम हे पहिल्यापासूनच होते म्हणूनच तिला रियलिटी शो बिग बॉस ची ऑफर आली होती. बिग बॉस १० मध्ये आपल्याला स्पर्धकाच्या रूपांमध्ये पाहायला मिळाली होती, ज्या कारणाने तिच्या करिअरवर चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला आणि मोनालीसा पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय झाली आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मोनालिसा एका एपिसोड मध्ये काम करण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त रुपये एवढा मानधन आकारते.
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की, भोजपुरी चित्रपटांमध्येच नाहीतर हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केलेले आहे. तिचे वय झालेलं आहे परंतु एवढे वय असताना सुद्धा ती खूपच सुंदर आणि तरुण दिसते. बिग बॉस या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या मोनालिसा ने आपल्या चांगल्या आणि हुशार बुद्धिमत्ता वर उत्तम सादरीकरण केले आणि आपल्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात घर केले.

मोनालिसा यांच्या पतीबद्दल बोलायचे झाल्यास तर तिच्या पतीचे नाव विक्रांत सिंह राजपूत आहे. जे पेशाने अभिनेते आहेत परंतु मोनालिसा समोर ते काहीच नाही आहेत. वर्ष २०१७ मध्ये मोनालीसा ने विक्रांत सिंह राजपूत सोबत लग्न केले होते. मोनालिसा आपल्या पतीपेक्षा जास्त कमावते परंतु तिला या बद्दल थोडासाही अहंकार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !