वजन जास्त असून देखील या अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे मोठा, या दिग्दर्शकाला करते डेट !

1421

गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटामधून आपल्या अभिनयातील करीयर ला सुरुवात करणारी अभिनेत्री हुमा कुरैशी हा आता एक सर्वांच्या ओळखीचा असा चेहरा बनली आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. लोक तिच्या सौंदर्यावर फिदा असतात. तिचे वजन थोडे जास्त आहे परंतु या गोष्टीचा तिच्या लोकप्रियते वर तिळमात्र ही फरक पडलेला नाही. तिचा चाहता वर्ग हा करोडोंच्या संख्येत आहे. चित्रपटा व्यतिरिक्त हुमा अनेक जाहिरातींमध्ये दिसत असते.
तिची फेअर अँन्ड लव्हली ची जाहिरात खूप प्रसिद्ध आहे. हुमा कुरैशी अधिकतर तिच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी चर्चेत असते. परंतु तिच्या लव लाईफ बद्दल फारच कमी लोकांना ठाऊक असेल. कारण तिचे वैयक्तिक आयुष्य मीडिया समोर मांडणे तिला आवडत नाही.
करीयर च्या सुरवातीला हूमाचे वजन खूप जास्त होते परंतु आता मात्र तिने स्वतः ला खूप मेन्टेन केले आहे. परंतु तरीही इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हुमा थोडी जाडी आहे असे दिसून येते. परंतु काहीतरी वेगळे म्हणून प्लस साईझ फिगर म्हणून तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.
हुमा कुरैशी चे नाव या आधी शाहिद कपूर, अनुराग कश्यप, सोहेल खान यासारख्या मोठ्या बॉलिवुड सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. परंतु या साऱ्या अफवा असल्याचे हुमाने स्पष्ट केले. परंतु खरे तर २०१९ पासून हुमा प्रसिद्ध दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांना डेट करीत असल्याची माहिती पुढे आली. यांच्या रिलेशशिपबद्दल मीडिया मध्ये अनेक चर्चा सुद्धा होत असतात.
हुमाच्या अप कमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास ती आर्मी ऑफ द डेड या चित्रपटात दिसणार असून सध्या ती याचं चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.