‘कोई मिल गया’ या चित्रपटात जादूची भूमिका साकारली होती या अभिनेत्याने ! 

890

२००३ मध्ये ‘कोई मिल गया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऋतिक रोशन, प्रीती झिंटा, रेखा यांसारखे अनेक मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला या चित्रपटातील जादू नक्कीच आठवत असेल. कोई मिल गया चित्रपटातील जादू या पात्रावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले होते. एवढेंच काय तर लोक आज देखील त्या जादूला विसरू शकले नाहीत. या चित्रपटात जादू पात्र कोणी साकारले याची माहिती फारच कमी लोकांना माहित आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्या बद्दल सांगणार आहोत ज्याने ‘कोई मिल गया’ या चित्रपटात जादू हे पात्र साकारले होते. ऋतिक रोशनच्या या चित्रपटाला राकेश रोशन यांनी प्रोड्युस केले होते. ऋतिक रोशन याने या चित्रपटात रोहित ची तर प्रीती झिंटा ने निशा ची भूमिका साकारली होती. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘इंद्रवदन पुरोहित’ यांनी कोई मिल गया या चित्रपटात सर्वात महत्त्वाची म्हणजेच जादूची भूमिका साकारली होती.‌ दुःखाची गोष्ट म्हणजे ते आता या जगात नाही.
इंद्रवदन पुरोहित यांचा २८ सप्टेंबर २०१४ ला मृत्यू झाला होता. जादू हे पात्र साकारण्यासाठी इन्द्रवदन पुरोहित त्यांच्याकरिता ऑस्ट्रेलिया वरून जादूचा पोशाख मागवला होता. या पोशाखाची किंमत तब्बल एक करोड रुपये इतकी होती. इंद्रवदन पुरोहित यांनी सब टीव्हीवरील नामांकित मालिका बालवीर मध्ये सुद्धा काम केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी हॉलीवूड चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये सुद्धा काम केले.‌
कोई मिल गया चित्रपट ८ ऑगस्ट २००३ ला प्रदर्शित झाला होता.‌ या चित्रपटाने फिल्मफेअर, आयआयफा यांसारखे बरेच पुरस्कार जिंकले होते. त्यानंतर कोई मिल गया या चित्रपटाचा क्रिश आणि क्रिश २ हे सिक्वेल सुद्धा आले.