Headlines

रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत !

कोरोना व्हायरसच्या संक्रमण आम्ही सर्वत्र लॉक डाउन केल्यामुळे लोकांनी घरात बसून करावे काय हा प्रश्‍न उद्भवत होता शिवाय टीव्ही वरील सर्व मालिकांचे शुटींग सुद्धा थांबवण्यात आले आहे. त्यामुळे टीव्हीवर सुद्धा त्याच त्याच मालिका बघून लोकांना कंटाळा येत होता म्हणूनच सरकारने पूर्वी प्रसिद्ध असलेल्या अशा मालिकांचे पुनःप्रक्षेपित करण्याचे ठरवले.
सध्या दूरदर्शन वाहिनीवर त्या करीत असलेल्या रामायण व महाभारत या मालिका पुनःप्रक्षेपित केल्या जातात. परंतु तरीही आजची पिढी त्या रामायणाचा तितकासा अनुभव येऊ शकत नाही जो अनुभव त्या काळी सर्व लोक टीव्हीसमोर एकत्र बसून घ्यायचे. त्याकाळी तर रामायण सिरीयल सुरू व्हायच्या आधी रस्त्यात गल्लीत एक लहान मुलगा सुद्धा दिसायचा नाही.
तसे बघायला गेले तर आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे कारण रामायण टीव्हीवर पुन्हा सुरू झाले आहे आणि बाहेर सुद्धा जास्त कोणी दिसत नाही फक्त कारण मात्र थोडे वेगळे आहे. आता घरात बसण्याचे कारण हे २१ दिवसांचा लॉक डाऊन आहे.
या रामायणाला आता ३२ वर्षे पूर्ण होतील याबाबत ३२ वर्षात खूप काही बदलले मात्र अजूनही रामायणातील पात्रांची भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पण यातील पाच कलाकार हे जग सोडून गेले. कोण आहेत हे पाच कलाकार याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
१) ललिता पवार, मंथरा दासी चे पात्र साकारणारी कलाकार –
रामायण या मालिकेत मंत्रा या दासी चे काम ललिता पवार यांनी उत्तम रित्या केले होते. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. यांचा मृत्यू १९९८ मध्ये झाला होता.
२) जयश्री गडकर, कौशल्या मातेचा अभिनय करणारी कलाकार –
रामायणातील कौशल्या माता ही कधीच विसरू शकत नाही. मालिकेतील कौशल्या माता सुद्धा अशीच होती. रामायण मालिकेत कौशल्या ची भूमिका जयश्री गडकर यांनी केली होती. मात्र ते आता या जगात नाहीत त्यांचा २००८ मध्ये मृत्यू झाला.
३) दारासिंह, पवनपुत्र हनुमानाची भूमिका साकारणारे कलाकार – 
हनुमान हे पात्र असे होते की आजही हनुमान भक्त त्यास विसरू शकत नाही. इतक्या बखुबीने हनुमानाची भूमिका निभावणारे दुसरे तिसरे कोणी नसून दारा सिंह होते. दारासिंह त्यांच्या पैलवानी साठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध होते. परंतु दुःखद बातमी म्हणजे ते आज आपल्यात नाहीत. २०१२ मध्ये त्यांचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला.
४) विजय अरोडा, मेघनाथ ची भूमिका निभावणारा कलाकार – 
रावणाचा मुलगा मेघनाथाचा राग हा सर्वांनाच ठाऊक आहे. आणि त्या ऱागा समवेत अप्रतिम भूमिका निभावणारे कलाकार मात्र आता या जगात नाहीत. रामायण मालिकेत मेघनाथाची भूमिका विजय अरोडा यांनी केली होती. त्यांचा मुंबईत २००७ मध्ये मृत्यू झाला.
५) संजय जोग, भरतची भूमिका साकारणारा कलाकार – 
भगवान रामाचा सर्वात प्रिय भाऊ भरत ज्याला संपूर्ण अयोध्या नगराचा राजा घोषित केले होते. परंतु त्याने राज गादी नाकारून संपूर्ण १४ वर्षे रामाची प्रतीक्षा केली आणि स्वतः सुद्धा झोपडीत राहिले. अशा या आज्ञाकारी भावाची भूमिका संजय जोग यांनी निभावली होती. यांचे वयाच्या ४० व्या वर्षीच लिव्हर निकामी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *