प्रेमविवाह केल्यानंतरही या सेलिब्रिटीनीं घेतला घटस्फोट, पोटगी म्हणून दिली एवढी रक्कम !

515

बॉलिवुड मधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लव्ह मॅरेज केले आणि त्यानंतर विभक्त झाले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कोंकणा सेन आणि रणवीर शौरी ने सुद्धा घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. हे जोडपे गेली ३ वर्षे वेगळे राहते. २०१४ मध्ये आलेल्या तितली या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रणवीर शौरी ने तो कोंकणा सोबत विभक्त होत असल्याच्या बातमीला कबुली दिली होती. कोंकणा आणि रणवीर शौरी चे लग्न २०१० मध्ये झाले होते. ह्यांचे लग्न ५ वर्षेच टिकू शकले त्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. कोंकणा आणि रणवीर सारखे असे अनेक कपल आहेत ज्यांनी प्रेमविवाह करून काही काळानंतर घटस्फोट घेतला. आणि हे घटस्फोट त्यांना खूप महाग पडले कारण घटस्पोटानंतर पोटगी म्हणून द्यावी लागणारी रक्कम ही करोडोंच्या घरात होती.

मलायका अरोरा आणि अरबाज खान – मलायका आणि अरबाज चे लग्न १२ डिसेंबर १९८८ मध्ये झाले होते. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगा आहे. मलायका आणि अरबाजचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. मलायकाने अरबाज कडून १५ करोड रुपयांची पोटगी मागितली.
हृतिक रोशन आणि सुझान खान – हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या वेगळे होण्याच्या बातमीमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती. या दोघांचे २००० मध्ये लग्न झाले आणि २०१४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुझानने पोटगी म्हणून हृतिक कडे ४०० करोड रुपये मागितले परंतु तिला त्यापैकी ३८० करोड रुपये मिळाले.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर – बॉलिवुड अभिनेत्री करिश्मा कपूर ने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूर सोबत लग्न केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघे विभक्त झाले. मिळालेल्या बातमीनुसार करिश्मा ने संजय कडून पोटगी म्हणून १४ करोड रुपयांची मागणी केली होती त्याच प्रमाणे दर महिना १० लाख रुपये खर्च साठी देण्यास सांगितले.
सैफ अली खान आणि अमृता सिंह – अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा घटस्फोट हा बॉलिवुड मधील महागड्या घटस्पोटांपैकी एक मानला जातो. या दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले होते त्यानंतर २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अमृता ने पोटगी म्हणून सैफ कडे ५ करोड रुपयांची मागणी केली होती.