या बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नीं राहतात बॉलिवूड इंडस्ट्री पासून दूर, हे आहे कारण !

739

आज आम्ही तुम्हाला त्या पत्नीबद्दल सांगणार आहोत ज्या बॉलिवूडच्या लाईम लाईट पासून दूर राहणं पसंत करतात !
प्रिया रुंचाल – जॉन अब्राहमने २०१४ मध्ये प्रिया रुंचाल सोबत लग्न केले. पिया पेशाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. तिला सतत लाईमलाईट मध्ये असणे पसंत नाही त्यामुळे ती लाईट पासून दूर असते. जॉन अब्राहम आणि प्रियाने कुटुंबीय आणि जवळील खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटो अजूनही समोर आलेले नाहीत. प्रिया बद्दल बोलताना जॉन नेहमीच सांगतो की ती एक प्रायव्हेट पर्सन आहे. तिला त्याचे वैयक्तिक आयुष्य जगण्यास खूप आवडते.
त्यामुळे ती नेहमी तिच्या कामाशी मतलब ठेवते. प्रियाचे शिक्षण लॉस एंजेलिस मधल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून झाले. तिची लॉ ची डिग्री पूर्ण झाली असून सोबत असलेले एमबीए सुद्धा केले आहे. तिथे बालपण तरी अमेरिकेत गेले असले तरी ती मूळची भारतातील हिमाचल प्रदेश मधील कंग्रा येथील आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात आंतरराष्ट्रीय वित्त निगम मधून केली.

परविन हाश्मी – बॉलिवूडचा सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी हा नेहमी लाईमलाईटमध्ये असतो. त्याची पत्नी परविन हाश्मी ही एक शिक्षिका आहे. इमरान आणि परवीन लग्नाआधी सहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिप’मध्ये होते. परविन ला लाईमलाईटमध्ये राहणे पसंत नाही त्यामुळे ते शक्य होईल तितके लाईम लाईट पासून दूर असते. ती एका सिंधी कुटुंबातील मुलगी आहे.
इम्रान हाश्मी मोठ्या पडद्यावर येण्या आधीपासूनच ते दोघे एकमेकांना डेट करीत होते. इमरान व परवीन हे बालपणापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. यांनी १४ डिसेंबर २००६ ला लग्न केले.
प्रियांका अल्वा – विवेक ओबेरॉय ने प्रियांका अल्वा सोबत २९ ऑक्टोबर २०१० मध्ये लग्न केले होते. प्रियांका ही एक सोशल वर्कर आहे. शिवाय ती एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सोबत जोडली गेली आहे. एका मुलाखतीमध्ये विवेकने सांगितले होते की जेव्हा तो प्रियांकाला पहिल्यांदा भेटला तेव्हा तिने जराही मेकअप केला नव्हता. ती खऱ्या आयुष्यात जशी आहेत तशीच माझ्यासमोर आली होती.
खरं तर प्रियांकाने तिच्या आई नंदिनीसोबत तिच्या अनेक सोशल प्रोजेक्टमध्ये काम केले. तिने “आर्टिस्टेट्स फाऊंडेशन फॉर आर्ट्स” नावाच्या स्वयंसेवी संस्थेशी संबंध जोडला आहे. तिचे वडील राजकारणात सक्रिय असतात तर आई समाज सेविका आहे. प्रियांका ही प्रशिक्षित नर्तक सुद्धा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !