या बॉलिवुड अभिनेत्रींनी विदेशी मुलासोबत लग्न करणे पसंत केले, जाणून घ्या कोण आहेत त्या !

449

बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे विवाहित आहेत. कोणता कलाकार कोणाशी लग्न करतो हे जाणून घेण्यासाठी त्या कलाकारांचे चाहाते नेहमीच उत्सुक असतात. काही कलाकार त्यांच्या चित्रपट किंवा मालिकां मधील अभिनेता अभिनेत्रीशी लग्न करतात तर काही जण भलत्याच कोणा व्यक्तीशी लग्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी स्वदेशीय सोडून विदेशी मुलांसोबत लग्न करणे पसंत केले. चला तर मग जाणून कोण आहे त्या अभिनेत्री.
सेलिना जेटली –
एकेकाळची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुपर हिट चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा तिचे वैयक्तिक बॉलिवूडमधील करिअर तितकेसे खास ठरले नाही. काही कॉमेडी चित्रपटांमध्ये स्वतःचा जलवा दाखवल्यानंतर सेलीनाने दुबईतील हॉटेल बिझनेस मॅन पीटर हाग सोबत लग्न केले.
लग्नानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सेलीना नेहमी पती आणि जुळ्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असते.
श्रेया सरन –
बॉलिवूड आणि साउथ कडील चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री अभिनेत्री श्रेया सरनने सुद्धा विदेशी पती केला. अभिनेत्री श्रेया सरन रशियन बिझनेस मॅन आंद्रेई कोशेवच्या प्रेमात पडली. लग्नानंतर श्रेया सरन तिच्या पतीसोबत स्पेन मध्येच राहते.
सागरिका मुखर्जी –
बॉलिवूड जगातील प्रसिद्ध गायक शान यांची बहीण गायिका सागरिका मुखर्जीने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सागरिका ने १९९२ मध्ये युके येथील बिझनेस मॅन सोबत लग्न केले. लग्नानंतर त्या दोघांना दोन मुले आहेत.
प्रीती झिंटा –
बॉलीवूड ची डिंपल गर्ल प्रीती झिंटा जेव्हा नेस वाडिया सोबत वेगळी झाली त्यावेळी तिचे मन देशात नव्हे तर परदेशात जाऊन रमले त्याचे कारणही तसेच होते कारण, प्रीती झिंटा विदेशी बिझनेस मॅन जीन गूडएनफ च्या प्रेमात पडली. प्रीती झिंटा आणि जीन गूडेएनफ ची पहिली ओळख कॅलिफोर्निया मध्ये झाली होती.
लग्नाआधी या दोघांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केले. प्रीतीने तिच्या विदेशी प्रियकरासोबत लग्न करून विदेशातच संसार थाटला.
प्रियंका चोपडा –
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका आणि तिचा पती निक जोनस हे दोघे खूप चर्चेत असणारे कपल आहे. या दोघांनी २०१८ मध्ये लग्न केले. प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील चित्रपट आणि टीव्ही सिरीज मध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

हे वाचा – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?

तर तीचा पती निक जोनस सुद्धा इंटरनॅशनल सेलिब्रेटी आहे. या दोघांची जोडी अधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक मानली जाते.
मधू सप्रे –
एकेकाळचे बोर्ड आणि सुपरमॉडेल असणारी मधू सप्रे ही मिस इंडिया विनर सुद्धा होती. मिलिंद सोमण सोबत केलेल्या फोटोशूट मुळे ती त्यावेळी खूप वादात अडकली होती. मधूने सुद्धा लग्नासाठी विदेशी नागरिक जियान मारियाला निवडले. लग्नानंतर ती इटलीमध्ये राहू लागली. या दोघांना एक मुलगी आहे तिचे नाव इंदिरा असे आहे.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

पूर्बी जोशी –
नामांकित अभिनेत्री पूर्बी जोशी ने सुद्धा अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने २०१४ मध्ये वैलेंटिनो फेहल्मन सोबत लग्न केले. या दोघांची पहिली भेट लॉस एंजलिस ला झाली होती. सध्या हे कपल त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत.

हे वाचा – ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ असलेल्या खिडकीला अधिक रॉड का लावलेले असतात, जाणून घ्या !

हे वाचा – ३३ वर्षांनी रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी बोलून दाखवली त्यांच्या मनातील खंत !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !