या सुंदर प्रसिद्ध अभिनेत्रींचे एवढे वय झाले तरी अजूनही त्यांनी लग्न केले नाही !

2708

बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. मात्र आज या पोस्टमधून आम्ही तुम्हाला साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या प्रेक्षकांना खूप आवडतात पण अजून त्या अविवाहित आहेत. या अभिनेत्रींनी अजूनही लग्न केलेले नाही.
१) नित्या मेनन –
नित्या मेनन ही दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्री मधील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नित्याचा जन्म बेंगलोर मधील एका मलयाली परिवारात ८ एप्रिल १९८८ ला झाला होता. नित्या अभिनेत्री सोबतच प्लेबॅक सिंगर सुद्धा आहे. नित्याने मल्याळम, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूड मधील हिट चित्रपट मिशन मंगल मध्ये दिसली होती. तसेच तिने ब्रेथ सीजन २ या हिंदी वेबसीरिज मध्ये सुधा काम केले आहे. आता ती ३१ वर्षांची झाली आहे परंतु अजूनही तिने लग्न केले नाही.
२) काजल अग्रवाल –
दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून एक सुंदर अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजलच्या सौंदर्याची तुलना प्रेक्षक एखाद्या परी सोबत करतात. काजल अग्रवाल चा जन्म १९ जून १९८५ ला झाला. काजल ने क्यू हो गया ना या २००४ साली आलेल्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिंघम आणि स्पेशल २६ हे बॉलीवूड चित्रपट तिचे बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले होते. सध्या ती ३४ वर्षांची झाली असून तिने अजूनही लग्न केले नाही.
३) रकुल प्रीत सिंह –
रकुल प्रीत सिंह ही दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्री मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रकुल प्रीत चा जन्म १० ऑक्टोबर १९९१ मध्ये झाला. तिने साउथ फिल्म इंडस्ट्री मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यासोबतच तिने बॉलीवूडमध्ये सुद्धा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती तेलंगणा राज्यात बेटी बचाव बेटी पढाव या अभिनयाची ब्रँड ॲम्बेसिडर आहे. ती दिसायला खूप सुंदर असून देखील तिने अजून लग्न केले नाही.
४) तमन्ना भाटिया –
तमन्ना भाटिया च्या सौंदर्याबद्दल तर आपण सर्व जण जाणतो. तमन्ना भाटिया च्या सौंदर्यापुढे हॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतात. तमन्ना ने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप काळ काम केले आहे सोबतच बॉलीवूड मध्ये सुद्धा काही चित्रपटांमध्ये काम केले. तमन्ना चा जन्म २१ डिसेंबर १९८९ ला मुंबई मध्ये झाला. ती आता ३० वर्षांची झाली आहे मात्र तरीही तिने लग्न केले नाही ‌.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !