Headlines

हे आहेत बॉलिवूड मधील सर्वाधिक किस्सिंग सीन असणारे चित्रपट, एका चित्रपटात तर आहेत २७ किस्सिंग सीन !

चित्रपट हिट होण्याकरिता त्यामध्ये मालमसाला असणे गरजेचे असते. आणि त्यात रोमँटिक सीन दाखवले तर तरुण वर्ग सहज त्या चित्रपटांकडे आकर्षित होतो. त्यामुळे आजकाल चित्रपटांमध्ये किसिंग सीन दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून अशा चार चित्रपटांबद्दल सांगणार आहोत त्यामध्ये सर्वाधिक किसिंग सीन होते.
१) ख्वाहिशें – हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये हिमांशू मालिक आणि मल्लिका शेरावत यांनी मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटात या दोघांनी एकूण १७ किसिंग सीन दिले होते. या चित्रपटाचे निर्माते विवेक नायक होते तर गोविंद मेनन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात मल्लिका आणि हिमांशू सोबतच महमूद बाबई आणि शिवाजी साटम यांनी सुद्धा काम केले होते.
२) नील अँड निक्की – नील अँड निक्की हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उदय चोपडा आणि तनिषा मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. यात त्या दोघांनी एकूण २१ किसिंग सीन दिले होते. हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला होता तर अर्जुन सब्लोक यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात उदय चोप्रा आणि तनिषा मुखर्जी सोबत अभिषेक बच्चन, रीचा पल्लोड, गौरव गेरा, पवन चोप्रा यांसारख्या कलाकारांसह इतर कलाकारांनी सुद्धा भूमिका साकारल्या होत्या.
३) बेफिक्रे – बेफिक्रे हा चित्रपट आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शित केला असून तो २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये रणविर सिंह आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते त्यांनी एकूण २३ किसिंग सीन दिले होते. या चित्रपटाची निर्मिती सुद्धा आदित्य चोप्रा यांनी केली होती. तर या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध सुप्रसिद्ध संगीतकार विशाल-शेखर यांच्या जोडीने केले होते. बेफिक्रे या चित्रपटाचे बजेट ६४ करोड रुपये होते तर या चित्रपटाने १०३ करोड रुपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता. या चित्रपटात आकाश खुराणा, आयशा राझा, अरमान रल्हन यांच्या देखील भूमिका होत्या.
४) शुद्ध देसी रोमान्स – २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटांमध्ये परिणीती चोपडा, वाणी कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात एकूण २७ किसिंग सीन होते. हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला असून मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सुशांत, परिणीती आणि वाणी कपूर सोबतच ऋषी कपूर , जितेंद्र परमार ,भुवन अरोरा, राजेश शर्मा व्यास यांच्या देखील भूमिका होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *