रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी !

821

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे घरात बसून प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका दूरदर्शन वर पुन्हा प्रक्षेपित केली जात आहे. शिवाय या मालिकेने पुन्हा एकदा इतर मालिकांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
त्यामुळे या मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलियाने एका मुलाखतीत एक अजब खुलासा केला आहे. चित्रपटात काम करण्याबद्दल निर्माते तिच्याकडे कोणती अट ठेवायचे या गोष्टीचा खुलासा तिने या मुलाखतीत केला.
रामायण मालिकेचा भरघोस यशानंतर दीपिकाला फिल्म इंडस्ट्री मधून अनेक चांगल्या ऑफर येऊ लागल्या. दीपिकाने सांगितले की सीता मातेची भूमिका साकारल्यानंतर मला भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपट निर्माते त्यावेळी सारखे मला फोन करायचे आणि चित्रपटात काम करण्यास संधी द्यायचे. मात्र त्यातील काही निर्माते चित्रपटात काम देण्याबदली तिच्यासमोर एक अट ठेवायचे जी खूप मुश्किल असायची.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !
चित्रपटाची ऑफर देते वेळी निर्माते तिला स्विमिंग सूटमध्ये काम करण्यास सांगायचे किंवा उत्तेजक कपड्यांमध्ये पडद्यावर काम करावे लागेल अशी अट ठेवायचे. ही गोष्ट दिपीका यांना बिलकुल पसंतीस पडायची नाही मात्र दिग्दर्शकांचे म्हणणे होते की दीपिका यांनी तिच्या सीता मातेच्या इमेज मधून बाहेर पडणे गरजेचे आहे.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !दीपिका यांनी सांगितले की रामायण मालिकेनंतर प्रेक्षक माझ्यामध्ये सीता मातेची छबी बघत असत. अशातच मी त्या प्रकारचा रोल करणे अजिबात चांगले वाटत नाही. प्रेक्षकांचा भ्रमनिरास मी करू इच्छित नाही. त्यामुळे चित्रपटांमध्ये मी कधीच छोटे कपडे परिधान केले नाहीत.
रामायण मालिकेत काम केल्यावर प्रेक्षकांच्या मनात माझी एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली होती. लोक मला देवी समान आणायचे त्यामुळे माझ्या चाहत्यांना मी निराश करू इच्छित नव्हते.

हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !