बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !

8738

फिल्म इंडस्ट्री ही एक अशी मायानगरी आहे जिथे तुम्हाला सफल होण्यासाठी काही वेळा सर्व काही पणाला लावावे लागते. २००० च्या दशकात हॉट आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री समीरा रेड्डी ने सांगितले की तुम्हाला बॉलिवुड मध्ये काम करायचे असल्यास तर तुम्हाला अशा गोष्टींची सवय ठेवावी लागते नाहीतर तेथे तुमचा टिकाव लागणे मुश्किल असते.

बॉलिवुड मधील कास्टींग काऊचचे किस्से बरेचदा ऐकायला मिळतात. नुकतेच आलेले मी टू हे प्रकरण अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे स्पष्टीकरण देते. आज या मायानगरीची काळी बाजू आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत.

१) पायल रोहतगी – आजकाल वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली पायल रोहतगी ही एकेकाळी बॉलिवुड मधील ग्लॅमरस क्विन होती. तिने फन आणि ३६ चाईना टाऊन यांसारखे अनेक चित्रपट केले आहे. मात्र तिच्या अपेक्षे प्रमाणे तिचे करीयर भरारी घेऊ शकले नाही. त्यावेळी तिची ओळख दिबाकर बॅनर्जी यांच्या सोबत झाली ते त्यावेळी शांघाई हा चित्रपट बनवत होते.

या चित्रपटात कल्की केकला ने जी भूमिका केली होती ती आधी पायल ला ऑफर केली होती. पायलला अचानक त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते ज्याचे रहस्य तिने बिग बॉसच्या घरात उघडकीस आणले.
पायल ने सांगितली की दिबाकर बॅनर्जी यांनी पायल ला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तिथे तिला त्यांच्यासोबत झोपण्यास सांगितले पण तिने तसे केले नाही.

२) ममता कुलकर्णी – ९० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णी ही नेहमीच तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणामुळे चर्चेत राहिली. ९० च्या दशकाच्या अंती तिच्या करीयरला उतरती कळा लागली होती.


काही केल्या तिच्या हाती यश टिकत नव्हते. त्यावेळी १९९८ मध्ये ममता यांनी राजकुमार संतोषी यांचा चायना गेट हा चित्रपट स्वीकारला. सुरवातीला राजकुमार ममता यांना चित्रपटात घेण्यास कचरत होते मात्र नंतर त्यांना अंडर वर्ल्ड मधून धमक्या येऊ लागल्या त्यामुळे त्यांना हा चित्रपट ममता यांना घेऊनच करावा लागला होता.

३) सुरवीन चावला – छोट्या पडद्यापासून करीयर ला सुरूवात करणारी अभिनेत्री सुरावीन चावला ही सर्वांनाच ठाऊक आहे. हेट स्टोरी २ मुळे ती प्रकाश झोतात आली.


पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही त्यामुळे तिला पंजाबी आणि दक्षिणेकडील सिनेमांमध्ये मोर्चा वळवावा लागला. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की तिची कोणतीच फिल्मी बॅकग्रांउंड नव्हती किंवा तिच्या कुटुंबात देखील या क्षेत्रातील कोणीच नव्हते.

तिने सांगितले की बरेचदा तिला साऊथ इंडस्ट्री मधून तिला कास्टींग काऊच च्या ऑफर आल्या होत्या मात्र तिने अशा गोष्टीत स्वतः ची इज्जत बळी दिली नाही.

४) राधिका आपटे – पॅड मॅन, बदलापूर, अंधाधुंद यांसारखे अनेक चित्रपट करणारी अभिनेत्री राधिका आपटेने अनेकदा स्वतः च्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पण राधिका सारख्या उत्कृष्ट अभिनेत्रीला सुद्धा या फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप स्ट्रगल करावे लागले आहे.

तिचे म्हणणे आहे की तिच्यासोबत कधीच कास्टींग काऊच सारखे प्रकार घडले नाहीत पण तिच्या ओळखी मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्यांना याला सामोरे जावे लागले होते. राधिकाने सांगितले की एका दिग्दर्शका सोबत व्हिडिओ चॅट करत असताना त्याने तिला एका चित्रपटाची ऑफर दिली.


पण त्याने साफ शब्दात सांगितले की या रोल साठी तुला माझ्यासोबत झोपावे लागेल. पण राधिकाने गो टू हेल असे उत्तर देऊन फोन ठेवून दिला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !