हे कलाकार आहेत खऱ्या आयुष्यातील एकमेकांचे दुश्मन, पण तरीही एकत्र करतात स्क्रीन शेअर !

1112

टेलिव्हिजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना त्यांचे चाहते एकत्र बघण्यास नेहमी पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का टेलिव्हिजन वर प्रसारित होणाऱ्या या मालिकांमध्ये भलेही त्या जोड्या परफेक्ट कपल वाटत असल्या आणि त्यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर खूप कमाल दिसत असली तरीही खऱ्या आयुष्यात मात्र काही जोड्यांचे बिलकुल पटत नाही. यातील काही कलाकार असे आहेत जे सेटवर एकमेकांशी जराही बोलत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र यात दिव्यांका त्रिपाठी आणि हिरा खान चे नाव सुद्धा सहभागी आहे.
१) हिना खान आणि करण मेहरा –
स्टार प्लसवर प्रसारित होणारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत मुख्य पात्र असणाऱ्या नैतिक आणि अक्षराची भूमिका हिना खान आणि करण मेहराने साकारली होती. पडद्यावर जरी यांची केमिस्ट्री खूप चांगली दिसत असली तरीही स्क्रीन मात्र या दोघांचे एकमेकांशी जराही पटत नाही. प्रेक्षकांचीही आवडती जोडी सेटवर कधीच एकमेकांशी मैत्रिपूर्ण वागली नाही. यांचे भांडण असे कधी झाले नव्हते पण तरीही एकमेकांची बोलण्यात मात्र हे दोघे थोडे कचरारचे.
२) तोरल रासपुत्र – सिद्धार्थ शुक्ला –
कलर्स वाहिनीवरील सुपरहिट मालिका बालिकावधू मधील सर्वांची आवडती जोडी तोरल रासपुत्रा आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या वैयक्तिक आयुष्यात खटके उडाले आहेत. ज्यावेळी त्या मालिकेत हनिमून सिक्वेन्स चे चित्रकरण काश्मीर मध्ये चालू होते त्यावेळेसच यांच्यामध्ये खटके उडाले असे म्हटले जाते. तेथे काही कारणास्तव या दोघांमध्ये भांडण झाले त्यानंतर काश्मीर वरून परत आल्यावर देखील त्यांचे भांडण मिटले नाही. मालिकेच्या सेटवर हे दोघे एकमेकांना नेहमीच टाळत असत.
३) रजत टोकस आणि परिधी शर्मा –
टेलिव्हिजनवर प्रसारित होणारी जोधा-अकबर हे प्रसिद्ध मालिका सर्वांनाच ठाऊक असेल. यामध्ये रजत टोकस आणि परिधी शर्मा या जोडीने प्रमुख कलाकारांचे काम केले होते. मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली. मात्र खऱ्या आयुष्यात त्या दोघांचे जराही पटत नाही. यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री जरी कमाल असले तरी ऑफस्क्रीन या दोघांचे जराही पटायचे नाही. रजत नेहमीच परिधी पेक्षा स्वतःला सीनियर मानायचा त्यामुळे सेटवर परीला सतत तो इग्नोर करायचा. तिच्याशी त्याने कधीच नीट बोलणे केले नाही.

हे वाचा – अशी होती रोहित शर्माआणि रितिका सजदेहयांची लव स्टोरी, युवराज सिंगने केली मध्यस्थी !

४) दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल –
स्टार प्लस वर प्रसारित होणारी सर्वांचे आवडते मालिका ‘ये हे मोहब्बते’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्यांका त्रिपाठी मुख्य अभिनेता म्हणून करण पटेल यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. पण खऱ्या आयुष्यात मात्र हे दोघे एकमेकांच्या दूर राहायचे. रिपोर्ट नुसार करण सेटवर नेहमीच एटीट्यूड दाखवायचा आणि शूटिंगच्या वेळी उशिरा यायचा. पण मध्यंतरी दिव्यांकाचे एक्सीडेंट झाले होते त्या वेळी या दोघांची पुन्हा मैत्री झाली. त्यानंतर मात्र करण पटेल पूर्ण बदलला आणि सर्वांशी नीट वागू लागला.

हे वाचा –  आता इम्रान हाश्मीरोमॅन्स करताना दिसणार टॉलीवूडमधील या अभिनेत्रीसोबत, जाणून घ्या कोण आहे ती !५) दीपिका सिंह आणि अनस रशिद –
दिया और बाती हम या मालिकेतील मुख्य कलाकार दीपिका सिंह आणि अनस रशिद हे आधी एकमेकांचे चांगले मित्र होते पण एके दिवशी दीपिकाने सर्वांसमोर अननस ला कानाखाली मारली तेव्हापासून या दोघांच्या मैत्रीत दरार पडली. रिपोर्टनुसार अनसने दीपिकाला चुकीचा स्पर्श केल्यामुळे दिपीकाने त्याला कानाखाली मारली होती. त्यानंतर या दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडून दिले होते.

हे वाचा – ह्या दिग्गज फिल्मी घराण्यातील अभिनेत्री सोबत प्रभास लग्न करणार असल्याच्या चर्चा ? पण ..

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !