कपाळावरील टिकली आणि साडी वाढवते या अभिनेत्रींचं सौंदर्य, बघा कोण आहेत त्या !

672

सध्याच्या काळात नवनवीन कपड्यांचे प्रकार, डिझाईन केलेले ड्रेस, जीन्स, गाउन असे कपडे घालणे पसंत करतो. सहसा पारंपरिक कपडे म्हणजे साडी, ड्रेस, कुर्ती असे कपडे परिधान केल्यावर मेकअप व्यतिरिक्त ही एक गोष्ट आपण आवर्जून वापरतो ती म्हणजे कपाळावरील टिकली. पारंपरिक वेषात कपाळावरील टिकली आपले सौंदर्य अधिक खुलवते. काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्या टिकली लावल्यानंतर अधिक सुंदर दिसतात. पाहूया कोण आहेत या अभिनेत्री.
१) तमन्ना भाटिया –
तमन्ना भाटिया ही टॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अशी एक अभिनेत्री आहे. तिने तामिळ, तेलुगू चित्रपटांव्यतिरिक्त काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कपाळावर टिकली लावल्यावर तमन्ना देखील खूप सुंदर दिसते.
२) काजल अग्रवाल –
हिंदी चित्रपट सिंघममध्ये अजय देवगण सोबत मुख्य भूमिकेमध्ये काजल अग्रवाल या अभिनेत्रीला आपण पहिलं. काजल ही टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चित्रपटांमध्ये ही किंवा खऱ्या आयुष्यात ही कपाळावरील टिकलीमुळे काजल खूप सुंदर दिसते.

हे वाचा – पती पत्नीच्या वयात, पती मोठा व पत्नी लहान का असावी, जाणून घ्या कारण !

३) अनुष्का शेट्टी –
बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. अप्रतिम अभिनय कौशल्यासहीत सुंदरतेने परिपूर्ण अशी अनुष्का ही चित्रपटांसाठी अधिक मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने टॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करते. अनुष्का देखील टिकली लावल्यानंतर तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
४) नेहा शर्मा –
नेहा शर्मा ही भारतीय अभिनेत्री आहे. ती बिहार राज्यातील राहणारी आहे. नवी दिल्लीमधील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी मधून तिने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. चिरुथा हा टॉलीवूड चित्रपट नेहाचा पहिला चित्रपट होता. नेहाला फार कमी वेळेस पारंपरिक वेषामध्ये पाहिले जाते, पण ती जेव्हा कपाळावर टिकली तेव्हा ती अधिक सुंदर दिसते.
५) माधुरी दीक्षित –
हिंदी चित्रपट सृष्टीतील धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित सर्वात जास्त मानधन मिळवणारी अभिनेत्री होती. अप्रतिम अभिनय, नृत्यकलेत निपुण, मोहक सौंदर्य यामुळे ती सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. तिच्या काळामध्ये एकापेक्षा एक असे हिट चित्रपट तिने केले आहेत. माधुरीच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने पारंपारिक वेश केला आहे. कपाळावरील टिकली तिचे मोहक सौंदर्य आपले लक्ष अधिक आकर्षून घेते.

हे वाचा – प्रत्येक महिलेने सकाळी उठताच करायला हव्या या ६ गोष्टी, त्यांचे नशीब उजळून जाईल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.