Headlines

या ८ कलाकारांची बॉलीवूड मध्ये चुकून झाली होती इंट्री, परंतु तरीही झाले सुपरस्टार !

कधीकधी तुमचे करिअर योग्य त्या मार्गावर आणण्यास तुमचे नशीब कारणीभूत ठरते. आता या ८ बॉलिवूड कलाकारांचे बघा ना ! हे कलाकार चित्रपट क्षेत्रात चुकून आले होते. परंतु एके दिवशी यांच्या नशीबाने त्यांना इतकी चांगली साथ दिली की रातोरात त्यांचे आयुष्यच बदलून गेले. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे हे बॉलीवूड कलाकारांना चित्रपटांमध्ये ब्रेक कसा मिळाला हे सांगणार आहोत.

अर्जुन रामपाल – डिझायनर रोहित बाल यांनी अर्जुन रामपालला एकदा दिल्लीमधील एका डिस्को क्लब मध्ये बघितले होते. त्यावेळी रोहित यांना अर्जुनचा लुक आणि स्टाईल इतकी आवडली की त्यांनी अर्जुनाला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. अर्जुन ने सुद्धा त्या वेळी त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि मॉडेलिंग मध्ये आपले नशीब आजमावून पाहिले. सुरुवातीला अर्जुन ने मॉडेलिंग मधून बक्कळ पैसा कमावला. त्यानंतर त्यास एकामागून एक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.
बिपाशा बासू – १९९६ मध्ये बिपाशा ची ओळख कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये प्रसिद्ध मॉडेल मेहर जेसिया यांच्याशी झाली होती. त्यावेळी मेहरने बिपाशाला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला. बिपाशाने देखील तिचे म्हणणे मानून तसेच केले आणि हळूहळू ती बॉलीवूड पर्यंत येऊन पोहोचली.
अक्षय कुमार – बँकॉक मधून परत आल्यावर अक्षय मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. अक्षय च्या एका मित्राने त्याला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. एका प्रोजेक्टसाठी मॉडेलिंग करण्यास अक्षय बंगळूर ला सुद्धा जाणार होता परंतु त्यावेळी त्याची फ्लाईट मिस झाली. म्हणून अक्षयने त्यावेळी मुंबईमधील एका फिल्म स्टुडीओ मध्ये जाऊन त्याचा पोर्टफोलिओ दिला. त्यावेळचा तो दिवस अक्षयला खूप लकी ठरला असेच म्हणावे लागेल कारण बंगळूरची फ्लाईट मिस झाल्यामुळेच त्याला बॉलिवूडचा पहिला चित्रपट मिळाला.
भूमी पेडणेकर – बॉलिवूडमधील धील एक अभिनेत्री होण्यापूर्वी भूमी यशराज फिल्मच्या शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम करायची. एकदा भूमीला ऑडिशन्स घ्यायच्या होत्या म्हणून तिने रेफरन्स साठी स्वतःची एक ऑडिशन क्लिप बनवली होती. यावेळी ही क्लिप आदित्य चोपडा यांच्या हाती लागली आणि आदित्यने भूमीला त्या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून कास्ट केले.
कंगना राणावत – चित्रपट दिग्दर्शक अनुराग बसू यांना कंगना राणावत मुंबईतील एका कॉफीशॉपमध्ये दिसली होती. तिला पाहताच क्षणी अनुराग यांना ती इतकी आवडली की त्यांनी दिला त्यांच्या गेंगस्टार या चित्रपटाची ऑफर केली. त्यानंतर कंगनाचे नशीब चमकले आणि आता ती बॉलीवूडची राणी म्हणून ओळखली जाऊ लागली.
जितेंद्र – जितेंद्र सुद्धा बॉलीवूड मध्ये चुकून आले होते. जितेंद्रच्या परिवाराचा ज्वेलरीचा बिझनेस होता. १९५९ मध्ये जितेंद्र काही ज्वेलरीची डिलिव्हरी करण्यासाठी वी. शांताराम यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांना बघताच क्षणी शांताराम यांनी जितेंद्र यांना संध्या ची बॉडी डबल म्हणून कास्ट केले. इथूनच जितेंद्र यांचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला.
माधुरी दीक्षित – माधुरी जेव्हा पंधरा वर्षांची होती तेव्हा तिचा डान्स परफॉर्मन्स बघून एका चित्रपट निर्मात्याने तिला चित्रपटाची ऑफर केली होती. परंतु त्यावेळी माधुरीने चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला कारण तिच्या आई-वडिलांना तिने चित्रपटांमध्ये काम करणे मान्य नव्हते. परंतु त्यावेळी माधुरीला एक छोटीशी चुणूक लागली होती किती बॉलिवूडमध्ये सुद्धा काम करू शकते.
परिणीती चोपडा – परिणीती यशराज फिल्मस् मध्ये एका पी आर चे म्हणजेच पब्लिक रिलेशन चे काम करत होती. परिणीती कडे बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स यांसारख्या तीन डिग्री आहेत. एक दिवस दिग्दर्शक मनीष शर्माने परिणीती ला लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटासाठी रोल ऑफर केला. या चित्रपटांमधील परिणीतीचे काम प्रेक्षकांना खूप आवडले त्यामुळेच आपण पुढे चित्रपटांमध्ये चांगले काम करू शकतो असे तिला मोटिवेशन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *