मरणानंतर या दोन अभिनेत्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एवढी संपत्ती पाठी सोडली !

1905

ऋषी कपूर भारतीय सिनेमांतील प्रमुख अभिनेत्यांमधील एक होते. ऋषी कपूर असा परिवारातील व्यक्ती होते ज्यांनी भारतीय सिनेमा उद्योग एका वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवला. अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर यांचा दुसरा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचा नातू म्हणजेच ऋषी कपूर. ऋषी कपूर यांनी त्यांच्या वडिलांचा चित्रपट मेरा नाम जोकर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सुद्धा मिळाला होता.
ऋषी कपूर यांनी अमर अकबर अँथनी, दो दूनी चार, डी-डे यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले. ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंह सोबत लग्न केले. नीतू सिंह यांच्यासोबत ऋषी कपूर यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केले होते. ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांना रिधिमा आणि रणबीर कपूर अशी दोन मुले आहेत. रणबीर कपूर सध्याच्या बॉलिवूड युगाचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो.
ऋषी कपूर हे त्यांच्या काळातील एक यशस्वी अभिनेता होते त्यामुळे त्यांच्याकडे आता करोडो रुपयांची संपत्ती आहे. आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. बॉलीवूड मध्ये कपूर खानदानाचे योगदान किती मोलाचे आहे हे सर्वजण जाणतात. भारतीय सिनेमा अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी संपूर्ण कपूर खानदानाने मेहनत घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बॉलिवुडमध्ये खूप मान मिळतो.
ऋषी कपूर यांनी १२३ चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या करियर च्या जोरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० करोड रुपये होते. त्यांच्या कामाव्यतिरिक्त ऋषी कपूर यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत ज्यांची किंमत जवळपास ९.७ मिलियन इतकी आहे. त्यांची संपूर्ण संपत्ती लक्षात घेता त्यांच्याकडे २०२० पर्यंत एकूण मिळून ४० मिलियन इतकी संपत्ती आहे.
ऋषी कपूर यांनी कसे पैसे कमावले?
१९७३ ते २००० दरम्यान ऋषी कपूर यांनी चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका निभावली यामधील ३६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करू शकले. ऋषी कपूर यांनी जरी मेरा नाम जोकर या चित्रपटाद्वारे जरी करीयर ला सुरूवात केली असली तरी प्रमुख भूमिकेत ते बॉबी या चित्रपटात दिसले होते. अनेक लोकांचे म्हणणे होते की बॉबी हा चित्रपट ऋषी कपूर यांचे करीयर मार्गी लावण्यासाठी बनला होता.
ऋषी कपूर यांनी ते एकटे नायक असलेले असे ५१ चित्रपट केले त्यापैकी ११ चित्रपट चांगले चालेले. तर वेगवेगळ्या स्टार कास्ट असलेल्या अभिनेत्यासोबत ४१ चित्रपट केले त्यातील २५ चित्रपट सफलता मिळवण्यात यशस्वी झाले. दो दूनी चार या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. तर कपूर अँड सन्स या चित्रपटातील त्यांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता म्हणून पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २००८ मध्ये त्यांना भारतीय चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी फिल्मफेयरचा लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला.

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !२००८ ते २०२० दरम्यान ऋषी कपूर जवळपास वीस-पंचवीस चित्रपटात दिसले. त्यातील लव्ह आजकाल, अग्निपथ, शुद्ध देसी रोमान्स, राजमा चावल, १०२ नॉट आउट यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.चित्रपटाने व्यतिरिक्त शशि कपूर यांनी जाहिरातील आणि ब्रँडच्या मार्केटिंग द्वारे सुद्धा पैसा कमावला. २०१७ मध्ये खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेंसर्ड ही आत्मकथा ऋषी कपूर यांनी प्रकाशित केली.

हे वाचा – चित्रपटांमध्ये लहान मुलाचे पात्र साकारणारा आज आहे एक मोठा अभिनेता, नाव पाहून थक्क व्हाल !

इरफान खान यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये त्यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरतात संपूर्ण बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली. बॉलीवूड सोबत राजकीय तसेच सर्वसामान्य जनता सुद्धा दुःखाच्या सागरात बुडालेली जाणवली. इरफान खान च्या पाठी त्यांची पत्नी सुतापा सिकदर, बाबिल आणि आयान अशी दोन मुले हा परिवार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार इरफान खान कडे तब्बल ३२१ करोड रुपयांची संपत्ती होती ते चित्रपट आणि जाहिरातींद्वारे पैसे कमवायचे. इरफान खान यांचे मुंबई येथे एक घर आहे तसेच जुहू येथे एक फ्लॅट सुद्धा आहे.‌ बॉलिवूड विश्वात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांपैकी तेसुद्धा एक होते. एक चित्रपट करण्यासाठी ते जवळपास १५ करोड रुपये घ्यायचे.

हे वाचा – या कारणामुळे काजोलला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेया चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट !जाहिरातीत काम करण्यासाठी चार ते पाच करोड रुपये घ्यायचे. इरफान खान कडे बीएमडब्ल्यू, टोयोटा सेलिका, मैसेराटी क्वाट्रोपोर्टे, ऑडी यांसारख्या लक्झरी कार आहेत. इरफान खान यांनी सर्वात शेवटी अंग्रेजी मीडियम या चित्रपटात काम केले होते.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !