मोठ्या पडद्यावरील हे कलाकार आहेत बालपणीपासूनचे एकमेकांचे मित्र !

601

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटात सोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यातील काही कलाकारांची दोस्ती तर बालपणापासून म्हणजेच शाळेपासूनची आहे. बॉलीवूड मधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकाच शाळेत किंवा एकाच वर्गात अभ्यास केला आहे. या कलाकारांची मैत्री बालपणापासून ते आत्ता पर्यंत चांगली घट्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड कलाकारांची माहिती देणार आहोत आणि बालपणी एकत्र शिक्षण घेतले होते.

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ – श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ला एकत्र मोठ्या पडद्यावर आपण अनेकदा बघितले आहे. परंतु या दोघांची मैत्री आजची नाही तर ती अनेक वर्षापूर्वीची आहे. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुंबईतील एका शाळेत शिकले आहेत.
अनुष्का शर्मा आणि साक्षी सिंह धोनी – भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणजेच विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या पत्नी एकत्र शिकल्या आहेत. साक्षी आणि अनुष्का आसाम मध्ये शाळेत एकत्र शिकत होत्या. सेंट मेरी स्कूल , मार्गेरिटा असे त्यांच्या शाळेचे नाव आहे.
करण जोहर आणि ट्विंकल खन्ना – करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे दोघे लहानपणी एकत्र शिकले आहेत. ट्विंकल खन्ना ने तिच्या ऑटोबायोग्राफी मध्ये असे नमूद केले आहे की ती त्याच शाळेत शिकली ज्यामध्ये करण जोहर सुद्धा शिकला होता.
सलमान खान आणि आमीर खान – सलमान खान आणि आमीर खानने अंदाज अपना अपना या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. लहानपणी हे दोघे एकत्र शिकले आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे. दुसरी मध्ये आमीर खान सलमान खान एकत्र शिकले होते.
कृष्णा श्रॉफ आणि अथिया शेट्टी – सुनील शेट्टी ची मुलगी अथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफ चि मुलगी कृष्णा श्रॉफ या दोघी बालपणी एकत्र शिकल्या आहेत. कृष्ण आणि आथिया या दोघी ही टायगर श्रॉफ ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिकल्या आहेत परंतु दोघेही त्याला दोन वर्षांनी ज्युनियर आहेत.
वरूण धवन आणि अर्जुन कपूर – वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांची मैत्री सुद्धा खूप जुनी आहे. हे दोघे बालपणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकले आहे. लहानपणी या दोघांनी एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र काम केले होते.