ऋषी कपूर यांची मुलगी ‘रिद्धिमा कपूर’ का राहते बॉलीवूड पासून दूर, जाणून घ्या !

8243

बॉलीवूड मधील कपूर खानदान खूप मोठे आहे. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडशी जोडली गेली आहे. परंतु त्यांच्यातील असेही काही आहेत जे या फिल्मी दुनियेपासून दूर असतात. आज आम्ही बोलत आहोत ते नितू कपूर आणि ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर बद्दल. ऋषी कपूर आता या दुनियेत नाहीत. ३० एप्रिल २०२० रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
ऋषी कपूरची मुलगी रिद्धिमा कपूर जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली तरीही दुसरा इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमवत आहे. सध्या रिद्धिमा कपूर हे नाव फॅशन इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध नाव म्हणून ओळखले जाते. रिद्धिमा ही नीतू आणि ऋषी कपूर यांची मोठी मुलगी. सध्या कपूर खानदानातील दोन मुली या बॉलीवूड इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्री आहेत त्या म्हणजे करीना कपूर आणि करिश्मा कपूर. तर दुसरीकडे रिद्धिमा कपूर ही बॉलिवूडपासून तेवढीच दूर आहे.

हे वाचा – पहिल्याच चित्रपटात केला स्वतःपेक्षा २४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमॅन्स, आता झालेय खूपच बोल्ड !

करीना कपूर आणि रिद्धिमा मध्ये फक्त सहा दिवसांचा फरक आहे. ज्यावेळी करीना कपूर तिच्या फिल्मी इंडस्ट्रीमधील पदार्पणात व्यस्त होती त्यावेळेस रिद्धिमा लंडनमध्ये शिक्षण घेत होती. रिद्धीमाला बालपणापासूनच अभिनयात जराही रस नव्हता. ती सिंगिंग, फॅशन आणि डिझायनिंगमध्ये स्वतःचे करिअर बनवू इच्छित होती. आजच्या काळात रिद्धीमाचे फॅशन इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. रिद्धिमा फॅशन डिझाईनिंग सोबतच एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुद्धा आहे. ‘R’ या नावाने रिद्धिमा चा ज्वेलरी ब्रँड आहे. तो लोकांमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर आहे.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

सोशल मीडियावर रिद्धिमा नेहमीच तिने डिझाईन केलेल्या ज्वेलरी चे फोटो शेअर करत असते. एवढेच नव्हे तर तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजना तिने डिझाईन केलेल्या ज्वेलरी गिफ्ट केले आहेत. या यादीत दीपिका, कॅटरीना आणि आलिया भट चे नाव सहभागी आहे. नुकतेच तिने एक ब्रेसलेट गिफ्ट केले होते. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हे ब्रेसलेट आहे असा या ब्रेसलेट चा अर्थ होता. रिद्धिमा भलेही बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी अनेक बॉलीवूड पार्टीज् मध्ये तिची उपस्थिती असते. अनेक सेलिब्रिटींच्या फंक्शनमध्ये तिला पाहिले गेले आहे. एवढेच नव्हे अनेक फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजवर रिद्धिमा तिच्या आईसोबत दिसली आहे. ती एकटीच करोडो रुपयांची मालकिन आहे.

हे वाचा – आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत !

रिद्धिमाने २००६ मध्ये दिल्लीचे बिझनेस मॅन भरत सहानी सोबत लग्न केले होते. रिद्धिमा आणि भरत सहानी ची पहिली भेट १९९७ ला लंडनमध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघे २००१ ला मुंबई भेटले. रिद्धिमा आणि भरत सहानीने ५ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भरताचे स्वतःची गारमेंट कंपनी आणि फॅशन हाऊस आहे. आता या दोघांना समारा नावाची एक मुलगी आहे. रिद्धिमा तिच्या मुली सोबत चे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.

हे वाचा – अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !