मेकअप करणे कोणत्या मुलींना आवडत नाही असे नाही. आणि त्यात जर ती मुलगी एक अभिनेत्री असेल तर मग स्वतः ला अजुन सुंदर दाखविण्यासाठी ती मेकअप करतेच. मेकअप केल्यानंतर प्रत्येक अभिनेत्री ही सुंदर आणि आकर्षक दिसते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी मेकअप करणे तर दूर मात्र तिला मेकअप हा प्रकार अजिबात आवडत नाही.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसुन टिव्ही विश्वात स्वतः च्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी राधिका मदान. राधिका ही मूळची दिल्लीची राहणारी आहे. राधिकाने तिच्या करीयरची सुरुवात मेरी अशिकी तुमसेही या मालिकेतून केली होती. या मालिकेत तिने इशानी चे पात्र साकारले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडल्यामुळे ती एक यशस्वी मालिका म्हणून ओळखली जाते.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे! राधिकाला मेकअप करणे मुळीच पसंत नाही. ही गोष्ट तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. तिने सांगितले की ती नेहमी फक्त काजळ आणि आय लाईनअर लावते. मात्र बिना मेकअपची सुद्धा राधिका मदान खूप सुंदर दिसते.
टिव्ही मध्ये करीयर करण्यापूर्वी राधिका दिल्ली मध्ये एक नृत्य प्रशिक्षक म्हणून काम करायची. त्यानंतर तिला कलर्स वाहिनीवरील एकता कपूरच्या मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत प्रमुख भूमिकेची संधी मिळाली. त्यानंतर तिला सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी म्हणून शक्ती अरोडा सोबत पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे ती डान्स रियालिटी शो झलक दिखलाजा ८ मध्ये सुद्धा दिसली होती.