विराट कोहलीने अनुष्का शर्माला कधीच लग्नाची मागणी घातली नाही, विराटने केला खुलासा !

4998

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या या दिवसात तिचा पती म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली सोबत मुंबईतील त्यांच्या घरात लॉक डाऊन आहे. या लॉक डाऊन आधी हे दोघेही आपापल्या कामात इतके व्यस्त होते की एकमेकांना द्यायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. मात्र आता त्यांच्याकडे खूप वेळ असल्यामुळे हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालता घालता त्यांच्या फॅन्स आणि मित्र परिवारा सोबत सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत.
नुकतेच विराटने फुटबॉल स्टार सुनील छेत्री सोबत लाईव्ह चॅट केले, या लाईव्ह चॅट मध्ये विराटने अनुष्का शी निगडीत अनेक रहस्यांचा खुलासा केला. सुनील छेत्री सोबत लाईव्ह चॅट करते वेळी विराटने त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील गमतीदार गोष्टी सांगितल्या. जेव्हा विराटने सांगितले की त्याने कधीच अधिकृतरीत्या अनुष्काला लग्नासाठी मागणी घातली नव्हती तेव्हा हे ऐकून सुनील खूप हैराण झाला. विराट ने सांगितले कि त्या दोघांमध्ये आपोआप प्रेम वाढत गेले.
विराट च्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही जीवन मनापासून जगता आणि प्रेम करता त्या वेळी कोणताही स्पेशल आणि व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरे करण्याची गरज नसते. कारण त्यावेळी प्रत्येक दिवस हा स्पेशल आणि व्हॅलेंटाइन डे प्रमाणे असतो. अनुष्काचे सुद्धा हेच मत आहे. आम्हाला हे डे वगैरे साजरे करण्याची गरज भासली नाही. कारण आम्हाला माहीत होते की पुढे जाऊन आम्ही एकमेकांसोबत लग्न करणार आहोत.
विराटने पुढे सांगितले की, मला ठाऊक होते की हे सर्व सूचक पद्धतीने चालले आहे. त्यामुळे आम्ही एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी खूप उत्साहित होतो. आणि बाकी सर्व गोष्टी आपोआप घडत गेल्या. या गप्पा गोष्टीमध्ये विराटने हे सुद्धा सांगितले की त्याच्या लग्नासंबंधी च्या योजना आखण्यासाठी त्याने त्याचा नकली ईमेल आयडी आणि नावाचा उपयोग केला होता. हे सर्व करण्यासाठी त्याला अनुष्काने खूप मदत केली. अनुष्काने सर्व उत्तम रित्या सुनियोजित केले हे मी सगळं कधीच एकट्याने करू शकलो नसतो. विराट आणि अनुष्का च लग्न ११ डिसेंबर २०१७ ला झाले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !