श्रद्धा कपूर ज्याच्या प्रेमात पडली आहे तो आहे तरी कोण वाचा येथे !

669

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ३ मार्चला वाढदिवस असतो. यावेळी श्रद्धाने तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. श्रद्धा चा जन्म ३ मार्च १९८९ मध्ये झाला. श्रद्धा कपूर ही शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची मुलगी. तीन पत्ती या चित्रपटातून श्रद्धाने बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले होते. परंतु तिला खरी ओळख मिळवून दिली ती २०१३ मध्ये आलेल्या आशिकी २ या चित्रपटाने. श्रद्धा सोशल मीडियावर तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत असते. श्रद्धा च्या वाढदिवसा निमित्ताने आज आम्ही तुम्हाला तिच्या व रोहनच्या लव स्टोरी बद्दल सांगणार आहोत.
श्रद्धा कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. रोहन हा प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून तो नेपाळचा एक प्रसिद्ध फुटबॉलर आहे. सोशल मीडियावर रोहन आणि श्रद्धा यांचे अनेक फोटो वायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच अशी खबर आली होती की, २०२० मध्ये हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत.
हे दोघे त्यांची रिलेशनशिप ऑफिशियल करू इच्छितात. असे म्हटले जाते की श्रद्धाची आई शिवांगी कपूर आधीपासूनच तिच्या लग्नाच्या तयारीसाठी लागली आहे, श्रद्धा च्या लग्नाच्या इव्हेंटची तयारी तिने आधीपासूनच प्लॅन केलेली आहे. परंतु याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत जेव्हा शक्ती कपूरला श्रद्धा आणि रोहन यांच्या लग्नाबद्दल विचारले गेले होते त्यावेळी त्यांनी या प्रश्नास उत्तर देणे टाळले होते.
शक्ती कपूर ने सांगितले की पुढील चार-पाच वर्षे तरी श्रद्धाचे लग्न करण्याचे मन नाही. आता हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की यावर्षी श्रद्धा रोहन सोबत बोहल्यावर चढणार की नाही. श्रद्धा कपूर न यावेळी तिचा बर्थडे लहान मुलांसोबत आणि वृद्धांचा सोबत साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना तिने लहान मुलांना व तेथे उपस्थित असलेल्या वृद्धांना सप्राईज गिफ्ट सुद्धा दिले. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. आणि या फोटोखाली कॅप्शन दिले आहे की लहान मुलांच्या व मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझा वाढदिवस धन्य झाला.
श्रद्धा कपूर लवकरच टायगर श्रॉफ सोबतच्या बागी ३ या चित्रपटांमध्ये दिसेल. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर ६ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यादे श्रद्धा कपूर वरून धवन सोबत स्ट्रिट डान्सर ३डी या चित्रपटांमध्ये दिसली होती. 26 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिस वर देखील या चित्रपटाने दमदार कमाई केली.