शाहरुख खानला त्याच्या मुलींसाठी बॉलिवूड स्टार नको तर हा व्यवसाय करणारा नवरा पाहिजे !

339

अभिनेता शाहरुख खान संपूर्ण सिनेइंडस्टीत किंग खान म्हणून ओळखला जातो. त्याचे चाहतेही त्याला किंग खान म्हणून हाक मारतात. शाहरुखने बॉलिवूड अनेक हिट सिनेमे दिले त्यामुळे त्याची फॅनफॉलोविंग संपूर्ण जगभर पसरली आहे.
शाहरुख जसा त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असतो त्याचप्रमाणे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत असतो.

शाहरुखचे त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहित आहे. अनेकदा तो वेगवेगळ्या मुलाखतीत किंवा कार्यक्रमांमध्ये कुटुंबावरील प्रेम व्यक्त करत असतो. आता पुन्हा एकदा शाहरुखने त्याच्या मुलीचा होणारा नवरा कसा असावा याबद्दल सांगितले आहे.

सध्या सर्वत्र याच गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. शाहरुखला त्याचा जावई म्हणून एक वकील हवा आहे. तसेच त्याच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याने एक अटसुद्धा ठेवली आहे.

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे कारण सुहाना खानचा एक चित्रपट किंवा एक वेब सीरिज लवकरच येत आहे. त्या वेबसिरीजचे नाव Archivis असल्याचे म्हटले जात आहे.

नुकतेच शाहरुख खानने दिलेल्या एका मुलाखतीत आपली मुलगी सुहाना खानचा बॉयफ्रेंड जो कोणी असेल किंवा ती याच्याशी लग्न करेल तो वकील असावा अशी अट घातली आहे. शाहरुख खानने म्हटले ज्याला माझा जावई किंवा सुहाना खानचा बॉयफ्रेंड व्हायचे असेल त्याला आधी वकील व्हायला हवे. सध्या माध्यमांमध्ये त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका कार्यक्रमात शाहरुखला विचारण्यात आले की सुहानाचा बॉयफ्रेंड किंवा पती कोणाला व्हायचे असेल तर त्याला आधी काय होणे आवश्यक आहे. यावर शाहरुखने उत्तर दिले की माझ्या मुलीच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याला आधी वकील म्हणून काम करावे लागेल.

यामागचे कारण सांगताना शाहरुख म्हणाला की, मला माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेले सहन होणार नाही. आणि जर ते पाणी त्याच्यामुळे आले तर मी त्याला सोडणार नाही. मग समजा त्याने मला कोर्टात खेचले तर यासाठी तो स्वता वकील असावा. शाहरुखच्या या वक्तव्यामुळे तो त्याच्या मुलीवर किती प्रेम करतो हे दिसून येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !