पीएम रिलीफ फंडा संदर्भात शाहरुख खान झाले ट्रोल, वाचा पूर्ण बातमी !

1005

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस संक्रमण होत असताना. कोरोना बाधित रुग्णांना मदत मिळावी यासाठी संपूर्ण देशवासीयांना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीत मदत करण्याचे अपील केले होते. यामध्ये अनेक बॉलिवूडकरांनी मदत केली आहे. या पंतप्रधान मदत निधीत अक्षय कुमार, सलमान खान, वरुण धवन, प्रभास, कपिल शर्मा अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदत केलेली आहे.
परंतु सध्या याबाबत बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे. कारण शाहरुख खानने अजुन पर्यंत कोणतेही मदत दिलेली नाही. किंवा त्याबाबतची कोणत्याही प्रकारची बातचीत सुद्धा केलेली नाही. यामुळे सध्या शाहरूख खानला खूप ट्रॉल केले जात आहे. पण या सर्व गोष्टींवर शाहरुख खानने कोणतीच रिऍक्शन दिलेली नाही.
परंतु शाहरुख खानचे फॅन्स मात्र शाहरुखने मदत केली असल्याची उदाहरणे देताना दिसत आहे. शाहरुखच्या चाहत्या वर्गाने एक हॅश टॅग चालू केला आहे. ज्या मार्फत ते शाहरुखला ट्रोल करणे बंद करण्याचा संदेश सर्वांना देत आहे. त्याचसोबत ते असेही लिहितात की, शाहरुखने अनेक कठीण प्रसंगी भारताला मदत केली आहे. तर काही युसर्स चे असे म्हणणे आहे की भारताच्या सुरक्षा मंत्र्यांनी स्वतः शाहरुखने केलेल्या मदतीसाठी त्याचे कौतुक केल्याचे सांगतात.
तसेच त्याच्या एका चाहत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात शाहरुख असे म्हणतो की, मी मुस्लिम आहे आणि मी सर्वांना दान करतो. मी कोणतेही चांगले काम केले की ते वैयक्तिक ठेवणे पसंत करतो. मी कोणतेही दानधर्म केले तर ते सोशल मीडियावर शेअर करत नाही.