बॉलीवुडच्या ताऱ्यांमध्ये सुद्धा लॉक डाऊनची सतर्कता, घरी बसून अभिनेत्री करत आहे असा वेळेचा सदुपयोग ! 

1744

सध्या पूर्ण विश्वात एका आजाराने हाहाकार माजवला आहे ज्याचे नाव आहे कोरोना व्हायरस. या व्हायरसमुळे सगळ्यांचे जनजीवन अस्ताविस्ता झाले आहे असे म्हणण्यास काही हरकत नाहीये. या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांचा संपर्क तुटला आहे आणि अनेक देशात तेथील परिस्थिती बिकट स्वरूपाची निर्माण झाली आहे.
या आजारामुळे अधिकांश भारतात शाळा, महाविद्यालय, शॉपिंग मॉल, चित्रपटगृह, मंदिर बंद झाले आहेत. याशिवाय चित्रपट आणि सीरियल यांचे शूटिंगसुद्धा बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. ज्याचा परिणाम चित्रपट आणि टीव्ही उद्योगावर होत आहे. सिनेसृष्टी आणि टीव्ही दुनियाचे अधिकतर कलाकार आणि अभिनेत्री या खतरनाक आजारामुळे आप आपल्या घरात भीतीपोटी बसले आहेत आणि अनेक नवीन कामे करू लागली आहेत.
घरात बॉलीवुडच्या या अभिनेत्री करत आहे ‘हे’ काम, दीपिकाने सोशल मीडियावरुन दिली माहिती – शूटिंगवर बंदी असल्याकारणाने कलाकार तसेच बॉलीवुडच्या काही अभिनेत्री काही वेळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. अशातच या मुक्त वेळेचा दीपिका पादुकोण योग्य तो सदुपयोग करत आहे. दीपिकाने सांगितले कि, व्हायरसमुळे मिळालेल्या या वेळेस त्या आपल्या कुटुंबीय सोबत वेळ घालवत आहे आणि त्यांच्या सोबत राहून त्यामुळे त्यांना आनंद मिळत आहे.
सध्या नुकताच त्यांनी इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला होता ज्यात त्या चेहऱ्यावर मसाज करताना पाहायला मिळाल्या. फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन लिहले आहे’ सीजन-१ एपिसोड-२, त्यांच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
जानेवारीत आला होता शेवटचा चित्रपट – दीपिका पादुकोण ह्या शेवटच्या जानेवारीमध्ये आपल्याला मोठ्या पडद्यावर नजरेस पडल्या होत्या, तेव्हा त्यांनी चित्रपट छपाकमध्ये काम केले होते. त्यांनी या चित्रपटात एक एसिड अटॅक झालेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांचा आगामी चित्रपट ‘८३’ आहे ज्यात त्या पती रणवीरसिंह सोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर भारताचे सर्वश्रेष्ठ आल-राउंडर आणि विश्व कप विजेता कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत.
अन्य कलाकार सुद्धा व्यतित करत आहे त्याचा वेळ – या महामारीमुळे बंद झालेल्या शूटिंग मुळे फक्त दीपिकाच नाही तर अन्य अभिनेत्रीसुद्धा त्याचा वेळ आनंदाने घालवत आहे. प्रियंका चोपड़ा आणि मलाइका अरोड़ा सुद्धा या सुट्टीच्या काळात आपला वेळ कुटंबियांसोबत व्यक्त करत आहे.
प्रियंका चोपड़ा ज्यांनी अमेरिकन पॉप गायक निक जोन्ससोबत लग्न केले होते, ते हा काळ कुटुंबियांसोबत राहून अमेरिकेमध्ये वेळ व्यतीत करत आहेत. त्यांच्याशिवाय मलाइका अरोड़ा सुद्धा या रिकाम्या वेळेत आपल्या घरी राहून आप्तेष्टांसोबत राहून वेळ घालवत आहेत.
त्यामुळे या बॉलिवूडमधील कलाकारांनी आम्ही जसे घरात थांबून वेळ घालवत आहोत तसेच आपण सुद्धा घरी थांबून कोरोना व्हायरस चा संसर्ग थांबवावा असा सूचक सल्ला सुद्धा देशवासियांना दिला आहे. कारण हि लढाई घराबाहेर जाऊन नाही तर घरात थांबून लढून जिंकायची आहे .