Headlines

वयाच्या १३ व्या वर्षी, ४१ वर्षांच्या व्यक्तीशी लग्न… सरोज खान यांचा थक्क करणारा जीवनप्रवास !

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊन चा काळ बॉलीवुड साठी भलताच अवघड काळ ठरला आहे. अनेक मोठे कलाकार यादरम्यान काळाच्या पडद्याआड गेले. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, सुशांत सिंह राजपूत आणि आता यांच्यानंतर सरोज खान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी हृदयक्रिया बंद पडल्याने सरोज खान यांचे निधन झाले.
मोठ्या स्टार्सना स्वतः च्या तालावर नाचणाऱ्या सरोज खान यांना बॉलिवूडमध्ये ‘मास्टर जी’ या नावाने ओळखले जायच्या. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी, करीना कपूर, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्रींनी सरोज खान यांच्यासोबत काम केले होते त्यांच्याकडून नृत्य शिकून घेतले होते. बाल कलाकार म्हणून स्वतःच्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सरोज खान यांनी बॉलिवूडमधील जवळजवळ सर्वच कलाकारांना स्वतःच्या तालावर नाचवले होते.
कोरिओग्राफर म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ मध्ये झाला त्यांचे खरे नाव निर्मला नागपाल असे होते. सरोज खान यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांनी नजराना या चित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. यामध्ये त्यांनी श्यामा नावाच्या लहान मुलीची भूमिका साकारली होती.

५० च्या दशकात सरोज यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सरोज यांनी सुप्रसिद्ध डान्सर बी सोहनलाल यांच्याकडून कथक, मणिपुरी, कथकली, भरत नाट्यम यांसारखे नृत्यप्रकार शिकून घेतले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी ४१ वर्षांच्या सोहनलाल सोबत लग्न केले. सोहनलाल यांचे आधी देखील एक लग्न झाले असून त्यांना चार मुले सुद्धा होती.
एका मुलाखतीत सरोज खान यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या शाळेत जायच्या. त्यावेळी त्यांना लग्न म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हते. मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात एक धागा बांधला त्यावेळी त्यांना वाटले की त्यांचे लग्न झाले. सरोज खान यांनी १९७४ मध्ये आलेल्या ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटांमधून एक सोलो कोरिओग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नगीना’ हा चित्रपट सरोज खान यांच्या करियर साठी सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटात सरोज यांनी श्रीदेवीला ‘मै तेरी दुश्मन’ या गाण्यासाठी कोरिओग्राफ केले होते. हे गाणे खूप हिट झाले त्यामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख मिळाली.
यानंतर १९८७ मध्ये पुन्हा एकदा सरोज यांनी मिस्टर इंडिया या चित्रपटातील गाण्यांना कोरियोग्राफ केले. या चित्रपटात त्यांनी ‘हवाहवाई’ आणि ‘काटे नही कटते दिन ये रात’ या गाण्यासाठी पुन्हा एकदा श्रीदेवीला कोरियोग्राफ केले होते. ही गाणी सुध्दा प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते. यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरिओग्राफ केले.

हे वाचा –मृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे सोडली !

बॉलीरिपोर्ट टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली … मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !