सलमान खान ला आपण सर्वजण बॉलिवूडचा दबंग खान किंवा भाईजान म्हणून ओळखतो. सलमान खानची लोकप्रियता ही चित्रपट सृष्टीत च नव्हे तर मालिका विश्वात सुद्धा दिसून येते. मालिका विश्वात बिग बॉस सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सलमान खानने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. आणि चित्रपट सृष्टीत त्याचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यात त्याचे चाहते त्याच्या वर फिदा असतात.
सलमान खानच्या कमाईचे बोलायचे झाल्यास तो बॉलिवुड मधील सर्वात महागडा आणि श्रीमंत असा अभिनेता आहे. तसे बघायला गेले तर सलमान खान कोणतीही महागडी वस्तू अगदी सहज विकत घेऊ शकतो परंतु गेली अनेक वर्षे तो गॅलेक्सी अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये राहत आहे. याच इमारतीत सलमान खानचा इतर परिवार ही राहतो. नुकतेच सलमान खानने आपण एखाद्या अलिशान बंगल्याऐवजी त्या फ्लॅट मध्ये का राहतो याचा खुलासा केला.
याबद्दल बोलताना सलमानने सांगितले की त्याला कोणत्या ही अलिशान बंगल्यात राहण्या पेक्षा बांद्र्याच्या फ्लॅट मध्ये राहायला खुप आवडते कारण आता मी ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्याच्या बरोबर वरच्या फ्लॅट मध्ये माझे आई वडील सुद्धा राहतात. मी माझ्या लहानपणासूनच या घरात राहतो आणि हेच मला खूप पसंत आहे.
सलमान ने असे ही सांगितले की ही पुरी इमारत एक परिवारा सारखी आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमच्या इमारती मधील आम्ही सर्व मुले एकत्र गार्डन मध्ये खेळायचो. काही वेळेस तर तिथेच झोपून सुद्धा जायचो. आधी आम्ही कोणतेच घर वेगळे मानायचो नाही. सगळी घरे आमच्यासाठी एकच होती. तेव्हा तर आम्ही कोणाच्या ही घरी घुसून जेवायचो. मी आजही त्याचं फ्लॅट मध्ये राहतो कारण माझी त्या घराशी अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
एका जुन्या मुलाखतीत सलमान खानचे वडील जे स्वतः एक लेखक आहेत त्यांनी सुद्धा या घरा सोबतच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी असे सांगितले की मी या घराशी मनाने खूप जोडलेला आहे. जर मला कोणी हा फ्लॅट सोडयला सांगितला तर मी मनाने खूप दुःखी होईन. हे घर जर मी सोडले तर मी कधीच खुश राहू शकत नाही.