पहा सलमान खानने कोण कोणत्या कलाकारांना कानाखाली वाजवली !

345

सलमान खानला त्याचा राग सहन होत नाही हे तर सगळ्यांना माहितच आहे पण तुम्हाला माहित आहे का सलमान खानने या मोठ्या कलाकारांना आणि दिग्दर्शकांना कानाखाली मारली आहे.
शाहरुख खान – बॉलीवूडच्या किंग खानला म्हणजेच शाहरुख खानला सलमान खानने कानाखाली मारल्याचे तर सगळ्यांनाच माहित आहे. २००६ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये शाहरुखने सलमानची कोणत्यातरी गोष्टीवरून मज्जा उडवली होती. जे शाहरुखला खूप भारी पडले होते. त्यावेळी सलमानला राग अनावर न झाल्यामुळे त्याने शाहरुखला सर्वांसमोर कानाखाली मारली होती.
अनुराग कश्यप – जेव्हा सलमान खान चा तेरे नाम चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. तेव्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी म्हणजेच अनुराग कश्यपने सलमानला चित्रपटाच्या गरजेसाठी छातीवरील केस कापण्यास सांगितले होते. परंतु या गोष्टीचा सलमानला राग आला आणि त्याने अनुरागच्या कानाखाली मारली. त्यानंतर निर्मात्यांशी बोलून अनुरागला चित्रपटातून काढून टाकले. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कुशीकने केले. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेला.

सुभाष घई – १९९७ मध्ये कोणत्यातरी कारणावरून सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी रागात सलमानने रागात सुभाष यांच्या कानाखाली मारली होती. परंतु काही दिवसांनी सलमानला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे त्याने सुभाष यांची माफी मागितली आणि सुभाषने देखील मोठ्या मनाने सलमानला माफ सुद्धा केले.

ऐश्वर्या राय – सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तर जगजाहीर होते. आणि हे नाते तुटल्यावर ऐश्वर्याने असा आरोप केला होता की सलमानने तिला तिच्या घरी येऊन कानाखाली मारली होती. तसेच त्याआधी सुद्धा चित्रपटांच्या सेट वर जाऊन पण काही वेळेस मारहाण केली होती. त्याचप्रमाणे जॉन अब्राहम सोबत सुद्धा सलमानचे पटत नाही.