६५ वर्षांची रेखा नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते? काय आहे यामागील रहस्य?

558

बॉलीवूडची सदाबहार सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे रेखा आता 65 वर्षाची झाली आहे. परंतु वाढत्या वयाचा तिच्या सौंदर्यावर अजूनही काहीच फरक पडलेला दिसत नाही. असे म्हणतात की रेखा ही एक बॉलीवूड मधील रहस्य आहे. प्रत्येक जण रेखाच्या आयुष्यातील रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. बॉलीवूड मधील अनेक पार्ट्यांमध्ये रेखा आवर्जून उपस्थित राहते. परंतु या पार्टीला सर्वांची नजर ओढून घेते ते म्हणजे तिच्या डोक्यावरील सिंदूर. ते सिंदूर ती नक्की कोणाच्या नावाचे लावते या गोष्टीचा छडा मात्र अजूनही लागलेला नाही.
रेखाचे प्रेम, रेखा चे घर, एवढेच नव्हे तर रेखा चे लग्न हे आजपर्यंतचे बॉलिवूडमधील रहस्यच बनून राहिलेले आहे. सध्या तिच्या आयुष्यात कोणी प्रेम करणारा व्यक्ती आहे की नाही हे तिलाच ठाऊक परंतु रेखा तिच्या कपाळावर सिंदूर भरून दिसते. त्यामुळे तिला पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे कोणाच्या नावाने लावते हा प्रश्न सहाजिकच येतो. रेखाचे बॉलिवूडचे महानायक असणारे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काय नाते होते हे जगजाहीर आहे. १९८० मध्ये रेखाला मनापासून असे वाटत होते की अमिताभ यांनी केवळ जगासमोर तिच्या सोबतचे नाते स्वीकारावे. परंतु असे काही झाले नाही आणि त्यानंतर एके दिवशी रेखा एका वेगळ्याच अंदाजात सर्वांसमोर आली. त्यामुळे सर्वजण चकित होऊन गेले.
१९८० मध्ये जेव्हा अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न झाले. लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांचे लक्ष हे जास्ती करून नवरा नवरी वर असते. परंतु या लग्नसमारंभात सर्वांची नजर ही रेखावर खिळून होती. कारण त्या लग्नसमारंभात रेखाने एका विवाहित स्त्री प्रमाणे तिच्या डोक्यावर सिंदूर भरले होते. त्यामुळे त्या समारंभात उपस्थित असलेले सर्वजण या गोष्टींबाबत कुजबूज करीत होते की रेखाने नक्की कोणाच्या नावाने सिंदूर भरले आहे ? रेखाने अमिताभ सोबत लग्न केले आहे का?
त्या लग्नसमारंभातील रेखाचे फोटोज अनेक मासिकांमध्ये छापून आले. परंतु या विषयावर रेखाने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हॅकोडे एक रहस्य बनून राहिले.
बॉलीवूड सूत्रांच्या म्हणण्यानुसार रेखा तिच्या डोक्यावर त्या व्यक्तीच्या नावाने सिंदूरला लावते ज्याच्या प्रेमासाठी ती गेली पस्तीस वर्षे तडपत आहे. तर काहीजण म्हणतात की रेखा फक्त तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी ते सिंदूर लावते. परंतु या मागचे नक्की खरे काय आहे हे फक्त रेखालाच माहित! परंतु जेव्हा केव्हा ती सिंदुर भरून बाहेर पडते तेव्हा अफवांना उधाण येते.रेखाला कधीच तिच्या वडिलांचे प्रेम मिळाले नाही की ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले त्या व्यक्तीचे प्रेम मिळाले नाही. रेखाने जेव्हा-जेव्हा खोडावर जीव लावण्याचा प्रयत्न केला त्या वेळी तिचा भरोसा तुटला. रेखा चे सर्वात जास्त गाजलेले अफेयर म्हणजे अमिताभसोबतचे परंतु याव्यतिरिक्तही तिच्या आयुष्यात खूपदा प्रेम हुलकावणी देऊन गेले. एका पाठवून एक असे अनेक जण रेखाच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आल्या परंतु त्या जास्त वेळ टिकू शकल्या नाहीत. या सर्व घटनांमध्ये रेखा एकटी पडली मात्र तिचे साथीदार हे बदलत गेले. विश्वजीत, नवीन निश्चचल, विनोद मेहरा, किरण कुमार, जितेंद्र ,शत्रुघ्न सिन्हा, संजय दत्त एवढेच नव्हे तर अक्षय कुमार सोबत सुद्धा रेखाचे नाव जोडले गेले होते. परंतु तिच्या आयुष्यात कोणतेच प्रेम टिकू शकले नाही.
१९९० मध्ये रेखाने बिझनेस मॅन मुकेश अग्रवाल सोबत लग्न केले परंतु हे लग्न तीन महिन्यातच तुटले. दोघांनी एकमेकांपासून विभक्त राहण्याचे ठरवले आणि घटस्फोट घेतला. यानंतर काही दिवसांनी मुकेशने फाशी लावून आत्महत्या केली. या सर्व घटनेत हैराण करणारी गोष्ट ही होती की फाशी लावते वेळी मुकेशने रेखाच्या ओढणीचा उपयोग केला होता ज्यावर रेखा चे नाव सुद्धा लिहिले होते‌. या घटनेवर चर्चांना खूप उधाण आले. रेखा व तिच्या पर्सनल सेक्रेटरी फर्जाना वर त्या आत्महत्ये विरुद्ध आरोप सुद्धा लावण्यात आला. रेखा अनेक वर्षांपासून तिच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये एकटीच राहते. रेखाचे वैयक्तिक आयुष्य तिच्या पर्सनल सेक्रेटरी फर्जाना शिवाय कोणालाच काही ठाऊक नसते.