घर चालविण्यासाठी करत होते अभिनेत्रीच्या कपड्यांची इस्त्री, आज एक चित्रपट बनविण्यासाठी घेतात कोट्यावधी रुपये !

988

रोहित शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी रोहित यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. बॉलिवूडच्या या झगमगत्या विश्वात प्रत्येक कलाकारांनी संघर्ष करून पुढे आले आहेत. त्यातील काही कलाकार यांनी छोट्या झोपडी पासून आपले विश्व सुरु करून त्यांनी मेहनतीच्या जोरावर गगन स्पर्श केला आहे आणि काहीनी मजुरी करून पुढे गेले आहेत. त्यापैकी एक रोहित शेट्टी हे नाव आहे.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. रोहित शेट्टी हे आजच्या काळातील चित्रपटसृष्टी मधील एक प्रसिद्ध चेहरा आहे, ज्याच्याकडे आजच्या काळात नाव, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा आहे पण एक काळ असा सुद्धा होता की त्यांचे वडील एम.बी. शेट्टी यांनी या बॉलिवूड उद्योगात नृत्य दिग्दर्शक (कोरीओग्राफर), स्टंटमॅन म्हणून काम केले होते आणि आई मधु यांनी चित्रपटात ज्युनियर कलाकार म्हणून देखील काम केले होते. अत्यंत दारिद्र्यात जगून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचे.
जेव्हा रोहित शेट्टी हे १४ वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या १७ व्या वर्षीच रोहित यांनी अजय देवगण यांच्या ‘फूल और कांटे’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल होतेे. त्यानंतरही त्यांनी १३ वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
एका मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाले होते, ‘त्याची कमाई फक्त ३५ रुपये एवढी होती. तेव्हा घरी चालवणे सुद्धा कठीण होते आणि घराची अवस्था पाहून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. त्यांनी अभिनेत्री तब्बूच्या साडींना इस्त्री सुद्धा केले होते. प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या अपयशानंतर २००३ ली रोहित यांनी आपला स्वतः चा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला.
यानंतर २००३ साली अजय देवगन यांच्यासोबत ‘जमीन’ हा चित्रपट बनविला पण हा चित्रपट काही फारसा चांगला झाला नाही. वर्ष २००५ मध्ये रोहित यांनी माया नावाच्या मुलीशी लग्न केले.माया ह्या एक बँकर आहेत. त्या या प्रकाशझोतापासून दूर असतात. माया आणि रोहित यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव ईशान रोहित शेट्टी आहे.
वर्ष २००६ मध्ये रोहित शेट्टी यांचा ‘गोलमाल’ हा पहिला चित्रपट हिट ठरला. यानंतर रोहित यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी या चित्रपटाच्या अनेक मालिका बनवल्या आहेत. सर्व मालिका हिट ठरल्या. ‘गोलमाल ३’ ने अनेक विक्रम मोडले होते. यानंतर रोहित शेट्टीने दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्यासोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट बनविला.आता रोहित शेट्टी सलग हिट्स चित्रपट प्रेक्षकांना देऊन यशाची पायरी पार करत बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे दिग्दर्शक ठरले आहेत आणि आजच्या काळात दिग्दर्शक रोहित चित्रपट तयार करण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये एवढे मानधन घेतात. त्यांची निव्वळ संपत्ती १०० कोटींहून अधिक आहे.