राम आणि रावण यांची मैत्री सोशल मीडियावर गाजत आहे, काय आहे प्रकरण जाणून घ्या !

849

सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट झाला. आणि तो एखादा सेलिब्रिटींचा असेल तर तो चांगलाच वायरल होतो. आणि चुकून जर त्या फोटोमध्ये असलेले समीकरण थोडा वेगळाच असेल तर काय विचारायलाच नको. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वेगळ्या समीकरणाचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चक्क राम आणि रावण एकमेकांच्या हातात हात घेऊन फोटोमध्ये पोझ देत आहेत.
थांबा तुमच्या कल्पनाशक्तीला ताण बसेल त्या आधीच आम्ही तुम्हाला सांगतो की हे काही खरेखुरे राम रावण नाहीत. तर हे आहेत रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील राम आणि रावण! सध्या सोशल मीडियावर रामायण मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल आणि रावण म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांची घट्ट मैत्री दिसून येते.

हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला. या लॉक डाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका पुन्हा प्रक्षेपित केली जात आहे. ८० च्या दशकातील या मालिकेने टीव्हीवरील इतर मालिकांचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
लोक खूप प्रेमाने ही मालिका बघत आहेत जेवढी ती ऐंशीच्या दशकात बघितले जायची. १८ एप्रिल रोजी दाखवण्यात आलेल्या एपिसोड मध्ये रामाच्या हातून रावणाचा वध दाखवला गेला. जसा हा एपिसोड प्रक्षेपित झाला तसा लगेच ट्विटरवर एक ट्रेंड आला. याचदरम्यान रामायणातील राम आणि रावण म्हणजेच अरुण गोविल आणि अरविंद त्रिवेदी यांचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये या दोघांची ऑफसेट मैत्री दिसून आली.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !हा फोटो रामायण मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान काढला असल्याचे दिसून येते ज्यामध्ये राम आणि रावण एकमेकांच्या हातात हात घालून फोटोसाठी पोज देत आहेत. एवढेच नव्हे तर या फोटोमध्ये यांचे हास्य बघून सहज समजते की त्यांची मैत्री किती घट्ट असेल.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !

कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला लॉक डाऊन घोषित केला होता. त्यामुळे टीव्हीवरील सर्व मालिकांचे शूटिंग बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी डीडी भारती या वाहिनीने रामायण मालिका रिटेलीकास्ट करण्याचा निर्णय घेतला.
सध्या रामायण मालिका टीआरपीच्या रांगेत पहिल्या क्रमांकावर आहे. शनिवारी प्रसारित झालेल्या एपिसोड मध्ये रावणाच्या वधानंतर सुद्धा ट्विटर’वर ही मालिका तुफान गाजत आहे. रामायणाचा शेवटचा एपिसोड रविवारी सकाळी नऊ वाजता प्रसारित होईल.

हे वाचारामायण मालिकेतील या कलाकारांचे झाले निधन, लॉक डाऊन मुळे ही येत आहे अडचण !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !