आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

1006

मागील काही दिवसात बॉलीवूडच्या क्युट कपल ला म्हणजेच आलिया भट आणि रणबीर कपूर ला घेऊन अनेक चर्चा समोर आल्या. या दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच एका वेबसाईटने असे म्हटले होते की आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे.

त्यामुळे हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकतील. त्या वेळी येणाऱ्या बातम्यांमध्ये असे म्हटले जात होते की रणबीर आणि आलिया चे लग्न या वर्षीच्या डिसेंबर मध्ये शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. त्यांच्या लग्नाबद्दल आलियाची खास मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरने विधान केले की तिला सुद्धा आलिया व रणबीरच्या लग्नाबद्दल कोणतीच कल्पना नाही.

ती सुद्धा आलिया व रणबीरच्या लग्नाबद्दलच्या चर्चा ऐकत आहे. त्याचबरोबर आकांक्षा ने सांगितले की खरे काय ते जाणण्यासाठी आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. आकांक्षा च्या अशा बोलण्यातून असे समजून येते की तिला सुद्धा आलिया व रणबीरच्या लग्नाबद्दल कोणतीच कल्पना नाही.

आलिया बरेचदा रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत दिसते. त्यांच्या फॅमिली फंक्शन मध्ये सुद्धा ती घरातल्या मेंबर प्रमाणेच वावरताना दिसते. रणबीरच्या कुटुंबासोबतचे आलिया चे फोटो सोशल मीडियावर खूपदा व्हायरल होत असतात. रणबीरच्या आईला सुद्धा ती पसंत असल्याचे समजले.
रणबीर आणि आलिया बद्दल बोलायचे झाल्यास लवकरच या दोघांनी एकत्र काम केलेला ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होईल. ४ डिसेंबर ही ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असल्याचे बोलले जाते. दोघांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आज या दोघांचे सुत जुळून आल्याचे म्हटले जाते.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.