मन्नत बंगल्याचे भाडे विचारले असता शाहरुख ने दिले असे उत्तर !

497

शाहरुख हा असा अभिनेता आहे जो बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध आहेच त्याच बरोबर तो सोशल मीडियावर सुद्धा वापर करत्यांच्या हृदयावर राज करताना दिसतो. तो सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतो. त्याचे फोटो,आगामी चित्रपट इत्यादी बाबत तो आपल्या चाहत्यांना खुश करत असतो. आज अश्याच एका गोष्टी बद्दल आम्ही आपणास सांगणार आहोत.
शाहरुख ने आपल्या चाहत्याशी बातचीत करण्यासाठी ट्विटरचा वापर केला. त्याचनंतर ट्विटरवर #AskSRK चा ट्रेंड सुरु केला आणि चाहत्यांनी शाहरुखला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शाहरुख ने पण आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याच्या चाहत्यांनी अनेक गमतीशीर प्रश्न सुद्धा विचारले आहेत.
गमतीशीर प्रश्नाचे दिले गमतीशीर उत्तर – शाहरुख ने पण आपल्या चाहत्यांच्या त्या गमतीशीर प्रश्नांना आपल्या अंदाज मध्ये उत्तर दिले. अशातच शाहरुखच्या एका चाहत्यांने असा प्रश्न विचारला ज्या प्रश्नाची कल्पना सुद्धा त्याला नव्हती तरीही शाहरुख ने चाहत्यांना चांगले उत्तर दिले. हा प्रश्न सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मन्नतचे भाडे – एका चाहत्याने ट्विटरवर विचारले कि सर, मन्नत मध्ये एक रूम भाड्याने हवा आहे. कितीला पडेल’. या प्रश्नावर शाहरुख म्हणाला कि “३० वर्षाच्या मेहनतीमध्ये पडेल “. शाहरुख च्या चाहत्याचा प्रश्न आणि त्याचे त्यावरील उत्तर लोकांना खूपच आवडले. या उत्तरामुळे शाहरुख ने पुन्हा आपल्या चाहत्यांचे हृदय जिंकले आहे.

शाहरुख खानचे रिप्‍लाय मिळवून त्यांचे चाहते खुश झालेले पाहायला मिळाले. याच दरम्यान शाहरुख खानला त्यांच्या एका चाहत्याने ट्विट केले. त्यात लिहले होते कि, मी सुहाना खानच्या वयाची आहे. मला एक सल्ला हवा आहे, काय आपण माझ्यासाठी असे करू शकता ?
यावर शाहरुख ने असा रिप्लाय दिला, शाहरुख ने असे लिहले होते, आपल्या आयुष्यात स्वतःला कोणत्याही नकारात्मक गोष्टीने प्रभावित होऊ नको देऊस, तुम्ही सुंदर आहात कारण ते तुम्ही स्वतः आहात.
तुमचे चित्रपट फ्लॉप होत आहे – अशातच एका युझर ने शाहरुखला विचारले कि आपले चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहे, आपल्याला कसे वाटत आहे? यावर शाहरुख ने जबरदस्त उत्तर दिले.
शाहरुख खान ने विना घाबरता जबरदस्त उत्तर दिले. त्यांनी ट्विट केले कि “बस तुम्ही प्रार्थनेत आठवण राहुद्या ”
अभिनेता रितेश देशमुख ने पण मस्करीत शाहरुखला एक प्रश्न विचारला रितेश ने शाहरुखला विचारले, ‘जीवनातील कोणता एक धडा तुम्ही अबराम कढुन शिकलात? रितेशच्या या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, जेव्हा पण तुम्ही दुखी, भूखे किंवा रागात असाल तेव्हा बस्स आपल्या अश्रूंना वाट करून द्या किंवा तुमच्या आवडीचे खेळ खेळा.
शाहरुख ने या दरम्यान आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नाचे उत्तर दिले. कामाबद्दल बोलले तर शाहरुख खान आपल्याला शेवटचे जीरो या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री कैटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होत्या. वास्तविक हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त कमाल दाखवू शकला नाही. आता अशी बातमी येत आहे कि, शाहरुख राजकुमार हिरानी च्या पुढील प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. खरं तर या गोष्टीची अजून घोषणा झालेली नाही.