एके काळी या क्रिकेटरवर जीव ओवळून टाकायची माधुरी, पण या गोष्टीमुळे तुटले मन !

13933

बॉलिवुडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचे नाव, फिल्मी अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर्स सोबत सुद्धा जोडले गेले होते.
बॉलिवुडची ही सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री माधुरी दीक्षित लाखो करोडो हृदयाची धडकन आहे. ९० च्या दशकापासून ते आता पर्यंत माधुरीची मोहिनी जरा देखील कमी झालेली नाही. तेव्हा पासून ते आजतागायत तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. पण माधुरी मात्र डॉ. श्रीराम नेनेंच्या प्रेमात पडली आणि त्यांच्याशी लग्न केले.

लग्नानंतर माधुरीने अमेरिकेत तिचा संसार थाटला. तिच्या लग्नाला इतकी वर्षे उलटली परंतु लोकांच्या मनातील माधुरीची जागा अजुन कोणीच घेऊ शकलेले नाही. या लॉक डाऊन च्या काळात अनेक सेलिब्रिटींचे किस्से व्हायरल झाले. अशातच माधुरीच्या जीवनाशी निगडीत काही किस्से सुद्धा पुन्हा समोर आले आहेत. आज आम्ही माधुरीच्या आयुष्यातील अशा एका व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्याचे नाते चित्रपटाशी नव्हे तर क्रिकेट सोबत होते.
बॉलीवूड आणि क्रिकेट मधील नाते हे खूप जुने आहे. या यादीत अनुष्का, दीपिका, किम शर्मा, शर्मिला टागोर यांसारख्या अनेक अभिनेत्री सहभागी आहेत. यातील काही अभिनेत्रींनी क्रिकेटर्स सोबत लग्न करून संसार थाटला तर काही जणी या स्टार क्रिकेटर्स सोबत काही काळासाठी रिलेशन मध्ये होत्या. या यादीमध्ये माधुरी दीक्षितचे नावं सुद्धा सहभागी आहे. तसे पाहायला गेले तर माधुरी दीक्षितचे नावं बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडले गेले मात्र एक काळ असाही होता जेव्हा तिचे मन क्रिकेटर अजय जडेजा वर जडले होते.
एके काळी माधुरी अजय जडेजाला खूप पसंत करायची. माधुरी सारखाच अजय सुद्धा माधुरीचा दिवाणा होता. अजय आणि माधुरीची पहिली भेट एका मॅगझिनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती. त्या पहिल्या भेटीतच माधुरी अजय वर खूप प्रभावित झाली. माधुरीच्या एका हास्यावर लाखो करोडो लोक फिदा व्हायचे मग त्यात अजय मागे राहील. त्यानंतर माधुरी आणि अजयच्या अफेअर च्या चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर काही दिग्दर्शकांनी या दोघांना घेऊन चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. मिळालेल्या माहितनुसार तर माधुरीच्या शिफारसी मुळे एका निर्मात्याने अजयला चित्रपटात घेण्याची घोषणा सुद्धा केली होती. या सर्व गोष्टींचा प्रभाव अजयच्या खेळावर होऊ लागला.
या दोघांचे अफेअर त्यावेळी चर्चेचा विषय बनले होते. यांच्या या चर्चा अजयच्या कुटुंबास बिलकुल पसंत पडल्या नाही. अजयच्या परिवाराने त्यास खेळावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यामुळे अजय त्याचा खेळ आणि रिलेशन मध्ये समानता राखण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याच काळात अजयचे नावं अजाहरुद्दिन सोबत मॅच फिक्सिंग मध्ये आले. या बातमीमुळे अजयच्या फॅन्स सोबतच माधुरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला. या नंतर माधुरी अजय पासून दूर राहू लागली.
त्यानंतर माधुरीचे नावं संजय दत्त सोबत जोडले गेले. १९९१ मध्ये साजन चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान माधुरी आणि संजयमधील जवळील वाढू लागली होती. यांच्या अफेअरच्या चर्चा इतक्या होऊ लागल्या की हे दोघं नक्की लग्न करतील असे सर्वांनी गृहीत धरले. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसायचे. पण खलनायक चित्रपटा दरम्यान जेव्हा संजयला अटक झाली तेव्हा पुन्हा एकदा माधुरीचे हृदय तुटले.
माधुरीने तिच्या करियर मध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. तिच्या नृत्याने सर्वांनाच तिचे दिवाणे बनवले. मात्र वेगवेगळ्या अफेअर च्या चर्चांनी तिची पाठ कधीच सोडली नाही. एवढेच नव्हे तर माधुरीचे नावं अनिल कपूर सोबत सुद्धा जोडले गेले होते. अनिल आणि माधुरीने सुद्धा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले त्यामुळे त्यांच्या जोडीला प्रेक्षक खूप पसंत करायचे.
जॉकी श्रॉफ सोबत सुद्धा माधुरीचे नावं जोडले गेले होते. मात्र वारंवार मन तुटल्यामुळे माधुरीने या साऱ्या गोष्टीत लक्ष देणे सोडून दिले. त्यानंतर तिने डॉ. श्रीराम नेनेंसोबत लग्न केले. सध्या ती लॉक डाऊन मध्ये तिच्या पती आणि मुलांसोबत वेळ घालवत आहे.