‘कुछ कुछ होता है’ मधली छोटी ‘अंजली’ २१ वर्षांनी दिसते अशी ..तुम्हाला विश्वास बसणार नाही !

447

बॉलिवुड मध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे लोक कधी ही बघणे पसंत करतात. या चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजेच कुछ कुछ होता है. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीचा हा चित्रपट लोकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहे. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता सुद्धा या चित्रपटाच्या सिक्वेल ची चर्चा सिनेसृष्टीत होत आहे.
हल्लीच या चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद करण जोहर ने त्याचा ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट केला. या वेळी करण जोहर खूपच भावूक झालेला दिसला. शाहरुख, काजल, आणि राणी मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त अजूनही काही कलाकार होते जे अजुन देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
या चित्रपटातील छोट्या आणि बडबड्या अंजलीला आज ही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या चित्रपटात शाहरुखच्या मुलीचा म्हणजेच अंजलीची भूमिका निभावणारी सना सईद या 21 वर्षात आता खूपच बदलली आहे. त्यामुळे छोटी अंजली खूपच मोठी झाली असून आता ती एक स्टार बनली आहे. या चित्रपटानंतर अंजलीने बादल आणि हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. मात्र मोठे झाल्यावर ती एवढे नाव कमावू शकली नाही.
२०१२ मध्ये आलेल्या करण जोहरच्या स्टूडेंट ऑफ द इयर या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या चित्रपटात सनासोबत वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट हे स्टार कलाकार देखील होते. सनाने चित्रपटासोबतच टिव्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. यामध्ये बाबुल का अंगना छुटे ना, लाल इश्क, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले तर झलक दिखला जा ६, झलक दीखला जा ७, नच बालिये ७ आणि झलक दिखला जा ९ यांसारख्या रियालिट शो मध्ये सुद्धा काम केले आहे.
सना आता पूर्वी पेक्षा फारच बदलेली असून सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध आहे. आजकाल ती तिच्या बोल्ड अंदाजाने फोटो शूट करून प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकवत असते. सना ने आतापर्यंत असे अनेक फोटोशूट केले आहे.