‘श्री कृष्णा’ मालिकेतील ‘कृष्ण’ आता कुठे आहेत व काय करतात, जाणून घ्या !

5862

रामायण आणि महाभारत या मालिकांच्या पुन्हा प्रक्षेपण सुरू झाल्याने टीआरपी स्पर्धेत मोठे बदल झाले आहेत. रामायण आणि महाभारत मालिके नंतर आता प्रेक्षक सोशल मीडियावर रामानंद सागर यांचीच श्री कृष्णा ही मालिका सुध्दा पुन्हा लावण्याची मागणी करत आहेत.
त्यामुळे प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन दूरदर्शन लवकरच ही सुद्धा मालिका प्रसारित करणार आहे. ट्विटर वरुन या दूरदर्शन वाहिनीने या मालिके बद्दल माहिती दिली पण ती मालिका कधी सुरू होणार हे मात्र सांगितले नाही. श्री कृष्णा या मालिकेत श्री कृष्णा ची भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी केली होती.
आता ही मालिका पुन्हा सुरू होणारच आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या सर्वदमन बॅनर्जी काय करतात आणि ते कुठे आहेत. श्री कृष्णा या मालिकेचे प्रसारण १९९३ ते १९९६ मध्ये झाले होते. त्यावेळी ही मालिका प्रेक्षकांना इतकी आवडली की मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेले.

हे वाचा – रामायणातील मंदोदरीने पतीच्या निधनानंतर सोडला अभिनय, आता जगण्यासाठी करते हे काम !श्री कृष्णा ची भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी अशा प्रकारे रंगवली होती की ते साक्षात खरे भगवान कृष्ण वाटायचे. त्यामुळे या भूमिकेने त्यांना खूप प्रसिध्दी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अर्जुन, जय गंगा मैया, ओम नमः शिवाय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमध्ये सुद्धा ते विष्णु नाहीतर कृष्णाचीच भूमिका करत.

हे वाचा – रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण !टीव्हीवरील मालिकां व्यतिरिक्त त्यांनी मोठ्या पडद्यावर सुद्धा अभिनय केला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, आदि शकराचार्य यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काही बंगाली आणि तेलगू चित्रपटात सुद्धा काम केले. आता खूप वर्षानंतर ते एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात दिसले होते.

हे वाचा – रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी !

एका काळानंतर सर्वदमन बॅनर्जी यांनी टिव्ही व फिल्म इंडस्ट्रीला पूर्ण विराम दिला होता. त्यानंतर ही चमचमती मायानगरी सोडून ते हृषिकेश येथे राहतात. तेथे राहून ते लोकांना मेडीटेशन शिकवतात. एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्री पासून दूर जाण्याचे कारण सांगितले की, त्यांनी कृष्णा ही भूमिका करतानाच ठरविले होते की ४५/४७ वर्षांचा होई पर्यंतच काम करणार. त्यानंतर त्यांना मेडीटेशन मिळाले आणि गेली २० वर्षे ते तेच काम करतात.
मेडीटेशन व्यतिरिक्त ते पंख नावाच्या एनजीओ ला सुध्दा सहाय्य करतात. हे एनजीओ उत्तराखंडातील झुग्गियों मध्ये राहणाऱ्या २०० गरीब मुलांना त्यांच्या उपजिविकेसाठी कमवण्यास मदत करतात. त्याचबरोबर २०० मुलांना शिकवतात.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !