लग्न किंवा पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी हि अभिनेत्री घेते तब्बल एवढे पैसे, वाचून डोळे पांढरे होतील !

1246

बॉलीवूड इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व्यक्तीकडे बक्कळ पैसा असतो असे म्हणतात. मात्र हे कलाकार फक्त चित्रपटांमधून कमाई करत नाहीत. त्यांचे कमाई करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. जसे की कोणत्याही एखाद्या प्रॉडक्टच्या जाहिरातीत काम करणे किंवा त्या प्रॉडक्टच्या कंपनीच्या ओपनिंग मध्ये किंवा कोणत्याही लग्न समारंभात सहभागी होणे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत जी लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी दीड करोड रुपये घेते. हो दीड करोड! वाचून थक्क व्हायला झाले ना पण हे खरे आहे. फक्त लग्नसमारंभात उपस्थिती दर्शवण्यासाठी अभिनेत्री करिना कपूर-खान दीड करोड रुपये घेते.
करीना कपूर ने तिच्या करिअरची सुरुवात २००१ मध्ये केली होती. आता करीनाला बॉलीवूड मध्ये येऊन एकोणीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आता सध्याच्या काळात करिना कपूर ही बॉलीवुडची सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचा व सौंदर्याचा चाहाता वर्ग हा खूप मोठा आहे.
सध्याच्या काळात करिनाकपूर इतकी प्रसिद्ध आहे की ती फक्त चित्रपटांमधूनही नव्हे तर अजूनही काही मार्ग आहेत ज्याद्वारे ती करोडो रुपये कमवते. करीना कोणत्याही पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी ६० लाख रुपये चार्ज घेते. आणि कोणत्याही गोष्टीच्या किंवा प्रॉडक्टच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तीस लाख रुपये घेते.
मात्र सर्वात जास्त पैसा तर ती कोणत्याही लग्नात सहभागी होऊन कमवते. एका लग्नात काही काळासाठी सहभागी होण्यासाठी करीना दीड करोड रुपये घेते. बॉलीवूड मध्ये फक्त करीनाच नाही तर असे अनेक कलाकार आहेत जे समारंभात सहभागी होण्यासाठी फी घेतात.
करीनाच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास अंग्रेजी मिडीयम, लालसिंग चड्डा या चित्रपटात ती दिसणार आहे. करीनाने नुकतीच सोशल मीडियावर एंट्री घेतली असून तिने स्वतःचे इंस्टाग्राम वर ऑफिशियल अकाउंट उघडले आहे. तिने अकाउंट उघडल्यावर काही क्षणातच मिलीयनच्या घरात तिचे फॉलोवर्स झाले.
सध्या क्वारनटाईन मध्ये करीना इंस्टाग्राम वर सैफ, तैमुर आणि तिचे घरातले फोटो शेअर करत असते. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.